शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत इंधन दर वाढीच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:13 IST

बारामती : बारामती शहरात इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसचे पदाधिकारी सोमवारी (दि, १२) रस्त्यावर उतरले. या वेळी सायकल ...

बारामती : बारामती शहरात इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसचे पदाधिकारी सोमवारी (दि, १२) रस्त्यावर उतरले. या वेळी सायकल रॅली काढत केंद्रातील भाजपच्या मोदीसरकारने केलेल्या इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला.

सामान्य जनतेला पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर वाढवले आहेत. सामान्य नागरिकांना दर वाढवून लुटण्याचे काम केंद्र सरकार करीत असल्याची टीका काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली. बारामती तालुका व शहर काँग्रेस, युवक काँग्रेस, विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी यामध्ये सहभागी झाले होते.

गुणवडी चौक येथील काँग्रेस भवन ते इंदापूर चौक येथे असणाऱ्या पेट्रोल पंपापर्यंत यावेळी सायकल रॅली काढण्यात आली. तसेच केंद्र सरकारचा विरोधात जोरदार घोषणाबाजी करत व फलक दाखवत निषेध केला. यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सायकलसह उपस्थित होते. सोमवारी दिवसभर काँग्रेसचे कार्यकर्ते मोदीसरकारचा निषेध म्हणून दिवसभर सायकल वापरणार असल्याचे वीरधवल गाडे यांनी सांगितले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्य आकाश मोरे, तालुका अध्यक्ष राजेंद्र निंबाळकर, शहराध्यक्ष अशोक इंगोले, युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस वीरधवल गाडे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष वैभव बुरुंगले, डॉ. विजय भिसे, विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष अ‍ॅड. आकाश पांडे, राहुल वाबळे, शिवाजीराव काकडे, विपुल तावरे, सुशांत सोनवणे आदी उपस्थित होते.

————————————————

फोटो ओळी :बारामती शहरात काँग्रेस भवन येथून काढलेली सायकल रॅली.

१२०७२०२१-बारामती-०३

————————————————