Pune: रेनकोटवरून मित्रांमध्ये वाद; पोटात चाकू भोसकून एकाचा खून, नऱ्हे परिसरात धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 12:38 IST2024-08-26T12:38:15+5:302024-08-26T12:38:50+5:30

दोघे मित्र सकाळी रेस्टॉरंटमध्ये आणि सायंकाळी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असून १ महिन्यापासून एकमेकांना ओळखत होते

Friends argue over raincoats One was killed by stabbing a knife in the stomach, a shocking incident in Narhe area | Pune: रेनकोटवरून मित्रांमध्ये वाद; पोटात चाकू भोसकून एकाचा खून, नऱ्हे परिसरात धक्कादायक घटना

Pune: रेनकोटवरून मित्रांमध्ये वाद; पोटात चाकू भोसकून एकाचा खून, नऱ्हे परिसरात धक्कादायक घटना

किरण शिंदे 

पुणे: पुण्यातील सिंहगड रोड भागातील नऱ्हे परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. रेनकोट वरून झालेल्या वादातून डिलिव्हरी बॉयने मित्राचा खून केल्याचे समोर आले आहे. आदित्य वाघमारे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सुरेश भिलारे या तरुणाला सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य आणि सुरेश हे दोघे ही मित्र असून सकाळी एका पिझ्झा रेस्टॉरंट मध्ये काम करतात आणि संध्याकाळी एका शॉपिंग वेबसाईट साठी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात. दोघंही जणं मूळ चे बीड जिल्ह्याचे असून गेल्या एक महिन्यापासून एकमेकांच्या ओळखीचे होते. काल दुपारी त्या दोघांमध्ये रेनकोट वरून वाद झाला. हा वाद मिटवण्यासाठी त्या दोघांनी रात्री नऱ्हे भागात भेटण्यासाठी ठरवलं. रात्री १०.३० वाजता ते दोघे ही भेटले मात्र वाद मिटण्याच्या ऐवजी त्यांच्यात अजून वादावादी झाली. दरम्यान, भिलारे ने त्याच्याकडील असलेला चाकू वाघमारे च्या पोटात खुपसला. या हल्ल्यात वाघमारे जखमी झाला आणि उपचारपूर्वी च त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. 

Web Title: Friends argue over raincoats One was killed by stabbing a knife in the stomach, a shocking incident in Narhe area