शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

बनावट मेल आयडीद्वारे खत कंपनीची ४ कोटी ९७ लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 23:55 IST

राष्ट्रीय खत कंपनी 'झुआरी'ची पोलीस ठाण्यात तक्रार

बारामती : राष्ट्रीय खत कंपनी झुआरी अ‍ॅग्रो केमिकल लिमिटेड कंपनीची मेल आयडी हॅक करुन बनावट मेल आयडी वापरत कोटयावधींची आर्थिक फसवणुक करण्यात आली आहे.याबाबत बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. दोन कंपन्यांचे मेल आयडी हॅक करून खोट्या मेल आयडीद्वारे बँक डिटेल्स पाठवून सुमारे  ४  कोटी ९७ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,याबाबत झुआरी कंपनीकडून याबाबत येथील कार्यालय व्यवस्थापक जुजे जोकिम बरेटो (रा. अभितेज गॅलक्सी, बारामती) यांनी ग्रामीण पोलीसांत फिर्याद दिली आहे. ११  ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत ही घटना घडल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे.  या कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय हे गोव्यात जयकिसान भवन, झुआरीनगर येथे आहे. कंपनीची बारामती एमआयडीती विद्राव्य खत बनविणारी कंपनी आहे. या कंपनीसाठी लागणारा कच्चा माल जगभरातील वेगवेगळ्या कंपन्यांकडून घेतला जातो. कंपनी गेली दहा वर्षांपासून दक्षिण दुबई यूएईमधील आरएनझेड इंटरनॅशनल एफझेडई कंपनी या पुरवठादाराकडून मोनो अमोनियम, फॉस्फेट, मोनोपॉटेशियम असा कच्चा माल घेते. २ सप्टेंबर २०१८ ते २३ सप्टेंबर २०१८ या कालावधीत झुआरीने या कंपनीकडून ४ कोटी ९७ लाख रुपयांचा १५७० टन माल घेतला. डिसेंबर २०१८ मध्ये झुआरीला ही आॅर्डर पोहोच झाली. दुबईतील कंपनीचे देणे काही कारणास्तव राहिले होते.

ही रक्कम देण्यासाठी झुआरीने आरएनझेड इंटरनॅशनल कंपनीच्या रमेश आनंदन यांच्या मेल आयडीवर बँक डिटेल्स देण्यासंबंधीचा मेल ११ डिसेंबर रोजी केला होता. दि. १४ रोजी त्यांच्याकडून बँक डिटेल्स पाठविण्यात आले. रक्कम जमा केल्यानंतर त्याच्या सॉफ्ट कॉपीज पाठवाव्यात, अशी मागणी आरएनझेड कंपनीने केली होती. त्यानुसार झुआरीने आरएनझेड कंपनीला रक्कम पाठवण्याबाबत पणजी येथील युनियन बँकेला मेलद्वारे कळविले. बँकेने २४ डिसेंबर रोजी ही रक्कम झुआरीने दिलेल्या बँक खात्यावर वर्ग केली. बँकेने रक्कम जमा केल्यानंतर त्यासंबंधीची कागदपत्रे झुआरीला दिली. झुआरीने पुढे ती आरएनझेड कंपनीला पाठवली असता या बँक डिटेल्स आमच्या कंपनीच्या नसल्याचे तसेच तुम्ही चुकीच्या खात्यावर पैसे वर्ग केल्याचे आरएनझेड कंपनीकडून सांगण्यात आले. त्यानंतर झुआरीने तात्काळ बँकेशी संपर्क साधत ज्या खात्यावर पैसे वर्ग केले आहेत, त्या खात्याचा केवायसी तपशील देण्याची मागणी केली.झुआरीने आरएनझेड कंपनीला यापूर्वी केलेले मेल तपासल्यानंतर बरोबर असल्याचे स्पष्ट झाले.  परंतु त्या कंपनीसह झुआरीचा मेल आयडी कोणी तरी हॅक करून वेगळ्याच बँक खात्याचे डिटेल्स पाठवून त्यावर रक्कम वर्ग करून घेत फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे.

ग्रामीण पोलिसांनी अज्ञाताविरोधात फसवणूकीसह माहिती-तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :BaramatiबारामतीfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस