हॉटेल बुकिंगचे काम देऊन साडेतीन लाखांची फसवणूक
By भाग्यश्री गिलडा | Updated: January 1, 2024 17:15 IST2024-01-01T17:14:26+5:302024-01-01T17:15:02+5:30
वानवडी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल

हॉटेल बुकिंगचे काम देऊन साडेतीन लाखांची फसवणूक
पुणे : हॉटेल बुकिंगचे करून टास्क पूर्ण केल्यास केल्यास चांगला मोबदला मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा प्रकार वानवडी परिसरात घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार २७ ऑक्टोबर २ नोव्हेंबर यादरम्यान घडला. याबाबत वानवडी परिसरात राहणाऱ्या उदय भाऊसाहेब बांदल (वय- ३८) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बांदल यांना अनोळखी क्रमांकावरून मेसेज आला. वेगवेगळे टास्क पूर्ण केल्यास चांगला परतावा मिळेल असे सांगून फिर्यादींचा विश्वास संपादन केला. यानंतर त्यांना टेलिग्राम ग्रुपवर ॲड करून ऑनलाइन हॉटेल बुकिंग करण्याचे काम सांगण्यात आले. काही दिवसांनंतर काही पैसे गुंतवले तर त्यावर नफा मिळवून देतो असे सांगितले. कदम यांचा विश्वास बसल्यानंतर वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ३ लाख ७५ हजार रुपये भरले. मात्र, पैसे भरल्यावर कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.