शहरं
Join us  
Trending Stories
1
कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?
2
Eknath Shinde Helicopter : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळामुळे भरकटले; पायलटने प्रसंगावधान राखत केले यशस्वी लँडिंग
3
Hantavirus Outbreak : जगावर नवं संकट! 'हंटा व्हायरस'चा भीषण उद्रेक; जहाजावरील प्रवाशांचे पलायन, आता संसर्गाचा मोठा धोका
4
Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
5
पार्किंगचा दर ऐकून गाडी घरीच ठेवाल! ४० टक्के दरवाढीचा झटका; सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नवे दर लागू
6
कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल
7
विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे?
8
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
9
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
10
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
11
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
12
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
14
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
15
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
16
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
17
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
18
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
19
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 21:36 IST

पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांची चार राज्यांत पाच हजार किलोमीटर प्रवास करून कारवाई

पिंपरी : जेष्ठ नागरिकांना “ब्ल्यू डार्ट” व “मुंबई पोलिस” अधिकारी असल्याचे भासवून दोन कोटी ८० लाख रुपयांची फसवणूक केली. या गुन्‍ह्यातील अंतरराज्यीय सायबर टोळीचा पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीतील सात संशयितांना कर्नाटक, तेलंगणा, केरळ आणि मुंबई अशा चार राज्यांत तब्बल पाच हजार किलोमीटरचा प्रवास करून अटक करण्यात आली.

मोहम्मद आमेर अखील मोहम्मद आरीफ (वय ३५, रा. हैद्राबाद), जिगर जितेश पटेल (२३, रा. मुंबई), अजिथ विजयन (३६, रा. तिरुअनंतपुरम, केरळ), सचिन पी. प्रकाश (२६, रा. कर्नाटक), मोहम्मद रिहान मोहम्मद तजमुल (१८, रा. म्हैसूर), सय्यद ओवेझ आफनान सय्यद शौकत (२०, रा. म्हैसूर) अशी अटक करण्‍यात आलेल्‍या संशयितांची नावे आहेत.

पोलिस उपायुक्त डाॅ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत. फिर्यादी जेष्ठ नागरिकांना संशयितांनी व्हॉट्सअ‍ॅप व व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून स्वतःला “ब्ल्यू डार्ट अधिकारी” आणि “मुंबई पोलिस अधिकारी” असल्याचे भासवले. त्यांनी “तुमच्या नावाचे पार्सलमध्ये ड्रग्ज, लॅपटॉप आणि कागदपत्रे सापडली आहेत; त्यामुळे अटक होऊ शकते” अशी भीती दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला. वरिष्ठ आयपीएस अधिकारी असल्याचे नाटक करून संशयितांनी फिर्यादींना विविध खात्यांवर मोठ्या रकमा जमा करण्यास भाग पाडले.

पोलिस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक निरीक्षक प्रवीण स्वामी, उपनिरीक्षक वैभव पाटील, सागर पोमण, रोहीत डोळस, प्रकाश कातकाडे, विद्या पाटील, पोलीस अंमलदार दीपक भोसले, विनायक म्हसकर, हेमंत खरात, सुभाष पाटील, किरण देवकर, श्रीकांत कबुले, ज्ञानेश्वर गवळी, अतुल लोखंडे, सोपान बोधवड, माधव आरोटे, नीलेश देशमुख, अभिजित उकिरडे, महेश मोटकर, अनिकेत टेमगिरे, संतोष सपकाळ, दीपक माने, शुंभागी ढोबळे, दीपाली चव्हाण, स्वप्नील खणसे यांच्या पथकाने ही कामगिरी केली. 

५८ कोटींच्या फसवणूक प्रकरणात सहभाग

प्राथमिक तपासात संशयितांच्या बँक खात्यांमधून सात कोटी ८६ लाखांहून अधिक व्यवहार झाल्याचे उघड झाले. मुख्य संशयित मोहम्मद आमेर हा महाराष्ट्र सायबरकडील ५८ कोटी रुपयांच्‍या फसवणूक प्रकरणातही सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे.

देशभरातून ३१ तक्रारी

सायबर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे संशयितांचे ठिकाण शोधून काढले. त्यानंतर विविध राज्यांत सलग कारवाई करत सर्व संशयितांना शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीत संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या खात्यांवर देशभरातील ३१ तक्रारी नोंद झाल्याचेही समोर आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Cyber ​​fraud: Crores swindled, interstate gang busted, six arrested.

Web Summary : Cyber police busted an interstate gang for duping seniors of ₹2.8 crore via digital arrest fraud. Seven suspects were arrested across four states. The accused posed as officials and extorted money by creating fear.
टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमPuneपुणे