पुणे - सातारा महामार्गावर कात्रज नवीन बोगद्यामध्ये चारचाकी जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 15:15 IST2022-08-14T15:15:35+5:302022-08-14T15:15:44+5:30

गाडीतील प्रवासी प्रसंगावधान दाखवून तात्काळ गाडीतून बाहेर पडले

Four-wheeler burnt in Katraj new tunnel on Pune-Satara highway | पुणे - सातारा महामार्गावर कात्रज नवीन बोगद्यामध्ये चारचाकी जळून खाक

पुणे - सातारा महामार्गावर कात्रज नवीन बोगद्यामध्ये चारचाकी जळून खाक

खेड शिवापूर : कात्रज बोगद्याच्या मध्यभागी रविवारी सकाळी 11 च्या सुमारास पुण्याहून साताराकडे जाणाऱ्या बाजूने एका कारने पेट घेतल्याची घटना घडली आहे.   त्यावेळी गाडीतील प्रवासी प्रसंगावधान दाखवून तात्काळ गाडीतून बाहेर पडले. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले होते. अग्निक्षमक दल येण्यापूर्वीच मोटार कार जळून खाक झाली.  

या घटनेमुळे कात्रज बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट पसरले होते. त्यामुळे बोगद्यात वाहतूक कोंडी झाली होती. कात्रज बोगद्यामधील व्हेंटिलेशन साठी असणारे पंखे त्याचप्रमाणे दिवे बंद असल्या कारणाने काही वेळासाठी या ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. धुरामुळे बोगद्यामध्ये अडकलेल्या प्रवाशांचा श्वास गुदमरला होता.बोगदा पास करण्यासाठी दुचाकी स्वारांना मोठी कसरत करावी लागत होती.

Web Title: Four-wheeler burnt in Katraj new tunnel on Pune-Satara highway