चारचाकीचा ब्रेक फेल झाल्यानं दिली दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गाडीसहीत थेट दरीत, पुण्याच्या कात्रज घाटातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 12:46 IST2021-09-06T12:46:14+5:302021-09-06T12:46:22+5:30

अग्निशमन केंद्रातील जवानांनी घटनास्थळी धाव घेत जखमी दुचाकीस्वारास बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

Four-wheeler brakes fail, hit two-wheeler; Incident in Katraj Ghat, Pune, directly in the valley with a two-wheeler | चारचाकीचा ब्रेक फेल झाल्यानं दिली दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गाडीसहीत थेट दरीत, पुण्याच्या कात्रज घाटातील घटना

चारचाकीचा ब्रेक फेल झाल्यानं दिली दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गाडीसहीत थेट दरीत, पुण्याच्या कात्रज घाटातील घटना

ठळक मुद्देदुचाकी सुरक्षा भिंतीला अडकून मोठे नुकसान

धनकवडी : चारचाकी कात्रजच्या जुन्या घाटातून पुण्याकडे येत असताना ब्रेक निकामी झाल्याने पुढे असणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार थेट खोल दरीत कोसळला. ही घटना सोमवारी सकाळी अकरा वाजता घडली. आलिम मुजावर असं जखमी दुचाकीस्वार जखमी दुचाकीस्वाराचे नाव असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी अकरा वाजता मिस्कर ग्राईंडर ही चारचाकी कात्रज जुन्या घाटातून पुण्याकड येत असताना ब्रेक निकामी झाल्यानं पुढं चाललेल्या दुचाकी स्वारास धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार तीस ते चाळीस फूट खोल दरीत कोसळला. दुचाकी सुरक्षा भिंतीला अडकून मोठे नुकसान झाले आहे. भारती विद्यापीठ पोलीस आणि कात्रज अग्निशमन केंद्रातील जवानांनी घटनास्थळी धाव घेत जखमी दुचाकीस्वारास बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

Web Title: Four-wheeler brakes fail, hit two-wheeler; Incident in Katraj Ghat, Pune, directly in the valley with a two-wheeler