Pune News : लोणी काळभोरमध्ये सेफ्टी टँकमध्ये पडून चार जणांचा गुदमरून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 14:31 IST2022-03-02T14:16:09+5:302022-03-02T14:31:00+5:30

मृतदेहांना टाकीतून काढण्यात आले आले

four people died due to suffocation cleaning septic tank loni kalbhor pune | Pune News : लोणी काळभोरमध्ये सेफ्टी टँकमध्ये पडून चार जणांचा गुदमरून मृत्यू

Pune News : लोणी काळभोरमध्ये सेफ्टी टँकमध्ये पडून चार जणांचा गुदमरून मृत्यू

पुणे: पुण्याजवळील लोणी काळभोरमध्ये सेप्टी टँकची स्वच्छता करताना चार जणांचा गुदमरून मृत्यू झाला. घटनास्थळी मदतीसाठी फायर ब्रिगेड आले आहे. मृतदेहांना टाकीतून बाहेर काढण्यात यश आले आले.

एक इमारतीच्या ड्रेनेज लाईनचे काम सुरू होते. त्या इमारतीच्या सेफ्टी टँकमध्ये सुरूवातीला दोघे जण स्वच्छतेसाठी उतरले. त्यानंतर त्या दोघांना गुदमरू लागल्याने त्यांनी आरडाओरड सुरू केली. लगेच त्यांच्याबरोबर असलेल्या ठेकेदाराने (रुपेश कांबळे) त्यांना वाचवण्यासाठी हात दिला अन् तोही टँकमध्ये पडला. त्यानंतर तिघांनीही आरडाओरड सुरू केली. हा आवाज ऐकू आल्याने तिथला एक व्यक्ती त्यांना वाचवण्यासाठी गेला असता तो देखील पडल्याने या अपघातात एकूण चार जणांचा मृत्यू झाला आहे. 

स्थानिकांना ही बातमी समजल्यावर त्यांनी तेथे धाव घेत चौघांपैकी एकाला बाहेर काढले होते. परंतू तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. नंतर फायर ब्रिेगेड घटनास्थळी येत त्यांना राहिलेल्या तीन मृतदेहांना बाहेर काढले.

Web Title: four people died due to suffocation cleaning septic tank loni kalbhor pune