शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

आणखी चार आरोपींना अटक

By admin | Updated: January 10, 2015 00:44 IST

अमोल बधे याच्या खून प्रकरणातील आरोपींना फरार होण्यास व पुण्याबाहेर वास्तव्य करण्यास मदत करणाऱ्या गजा मारणे टोळीतील चौघांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे

पुणे : नीलेश घायवळ टोळीतील अमोल बधे याच्या खून प्रकरणातील आरोपींना फरार होण्यास व पुण्याबाहेर वास्तव्य करण्यास मदत करणाऱ्या गजा मारणे टोळीतील चौघांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. या अटकेनंतर बधे खूनप्रकरणातील आरोपींची संख्या १९ झाली आहे. मोक्काचे विशेष न्यायाधीश पी. पी. कुलकर्णी यांनी आरोपींना १९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.विशाल विलास धुमाळ (वय २८, रा. राजेंद्रनगर, नवी पेठ), योगेश नारायण मोहिते (वय २७, रा. श्यामसुंदर सोसायटीसमोर, म्हात्रे पूल, दत्तवाडी), बाळकृष्ण ऊर्फ पांड्या लक्ष्मण मोहिते (वय ३०, रा. सांगली) व सोमप्रशांत मधुकर पाटील (वय ४२, रा. बाणेर, बालेवाडी) अशी आरोपींची नावे आहेत.मारणे टोळीने २९ नोव्हेंबर रोजी भरदिवसा वैकुंठ स्मशानभूमीजवळ घायवळ टोळीतील तिघांवर खुनी हल्ला केला होता. त्यात अमोल बधे याचा मृत्यू झाला होता; तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले होते. धुमाळ याने इतर अटक आरोपी व पोलीस शोध घेत असलेल्या आरोपींना पुणे सोडून जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था केली होती, तसेच त्यांना लपून राहण्यासाठी आर्थिक मदत केली आहे. ती वाहने जप्त करायची आहेत. त्यांना कोठे लपवून ठेवले होते? योगेश मोहिते यानेही घटनेच्या दिवशीच आरोेपींच्या जेवणाची व पळण्याची व्यवस्था केली होती, तर पांड्या मोहिते याने अग्निशस्त्रे, काडतुसे पुरवली आहेत. अशा प्रकारे त्यांना आणखी कोणी मदत केली आहे का? संपर्कासाठी कोणती सिमकार्ड वापरले याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडी द्यावी असा युक्तिवाद सरकारी वकील प्रताप जाधव यांनी केला. न्यायालयााने युक्तिवाद ग्राह्य धरला. (प्रतिनिधी) ४या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १९ जणांना अटक केली आहे. त्यांपैकी १४ जण हे न्यायालयीन कोठडीत असून दोन जण पोलीस कोठडीत आहेत. तर, गुरुवारी चौघांना अटक केली आहे. त्यांना शुक्रवारी न्यायालयात आणले होते.