कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या चौघांची येरवडा कारागृहात रवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 12:33 IST2025-01-04T12:32:46+5:302025-01-04T12:33:32+5:30

बारामती शहरातील पहिलीच कारवाई

Four men who terrorised with sickles sent to Yerwada jail | कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या चौघांची येरवडा कारागृहात रवानगी

कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या चौघांची येरवडा कारागृहात रवानगी

सांगवी (बारामती) : सोशल मीडियावर शास्त्रांचे स्टेट्स व हातात शस्त्र घेऊन परिसरात दहशत माजवणाऱ्या तरुणांना अखेर तुरुंगाची हवा खायला जावे लागले आहे. बारामती शहरातील ही पहिलीच कारवाई असल्याची माहिती बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिली. या कारवाईमुळे मात्र यापुढे शास्त्रांचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्यावर जरब बसेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. त्यमित्ताने समाजात भीतीचे वातावरण निर्माण होणार नाही. 

सोशल मीडियावर फेसबुक, इंस्टाग्राम तसेच व्हाट्सअप च्या माध्यमातून शस्त्रे हातात घेऊन स्टेटस ठेवणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याचा इशारा बारामती पोलीस प्रशासनाने दिलेला होता, त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने ठोस पावले उचलून अप्पर पोलीस अधीक्षक यांनी बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कोयता हातात घेऊन मिरवणाऱ्या आरोपींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

आरोपी योग्य जामीनदार हजर करू न शकल्याने आरोपी यश दीपक मोहिते,शुभम उर्फ बाळू काळू जगताप दोघे रा. आमराई,  बारामती),आदित्य राजू मांढरे रा.  चंद्रमणी नगर अमराई बारामती) व अनिकेत केशवकुमार नामदास रा. दीपनगर भवानीनगर ता. इंदापूर जि. पुणे ) या चौघांची मध्यवर्ती कारागृह येरवडा पुणे येथे साध्या कारावासासाठी रवानगी करण्यात आली.  सदरचा प्रतिबंधात्मक कारवाईचा प्रस्ताव हा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक बारामती कार्यालयास पाठवलेला होता. त्यानुसार पुढील कारवाई करण्यात आली. 

पोलिसांकडून इशारा 
यापुढे देखील जागरूक नागरिकांनी अशा पद्धतीचे स्टेटस सोशल माध्यमावर ठेवणाऱ्या इसमांचे स्क्रीन शॉट घेऊन शक्ती नंबरवर किंवा प्रभारी अधिकारी यांना पाठवल्यास त्या आरोपींवर तात्काळ कारवाई करण्यात येईल व बातमीदार यांचे नाव गोपनिय ठेवण्यात येईल असे आवाहन बारामती शहर पोलिसांनी केले आहे.

शक्ती नंबरचा वापर करण्याचे आवाहन 
जागरूक पालकांनी,शिक्षकांनी,तसेच नागरिकांनी शहरातील चौका चौकात टवाळखोरी करणाऱ्या, शाळा महाविद्यालय परिसरात मुलींची छेडछाडी करणाऱ्या,उघड्यावर मद्य प्राशन करणाऱ्या युवकांची माहिती व फोटो शक्ती नंबर 9209394917 वर  पाठवावी त्यांच्यावर योग्य कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Web Title: Four men who terrorised with sickles sent to Yerwada jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.