शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

वाघोली येथे दोन सराईतांसह चौघे गजाआड, घरफोडीचे गुन्हे दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2019 3:15 PM

पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी पायगुडे वस्ती येथे घरफोडी केल्याची कबुली दिली.

ठळक मुद्देपरिसरातील अनेक घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

लोणी काळभोर: पुणे शहर व ग्रामीण भागात घरफोडी करणाऱ्या दोन सराईतांसह चौघांना रविवारी (दि़ ६) दुपारी वाघोली येथून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने गजाआड  केले आहे़. यातील अन्य दोघे हे चोरीचा ऐवज विकणार आहेत़. दरम्यान दोघांनी वाघोली येथील पायगुडे वस्तीत घरफोडी केल्याची कबूली दिली़. राहूल यमनप्पा गायकवाड ( वय २१, रा.गारुड वस्ती, लोहगाव, पुणे ), भरत संजय स्वामी ( वय १९, रा. संतनगर ससाणे हाईटस, लोहगाव, पुणे ) अशी सराईतांची नावे आहेत़ तर  विनोद गणेश सिंग ( वय ३४, रा.धानोरी गावठाण, पुणे ), उपेंद्र शिवपुजन राम ( वय२४, रा. अमनोरा पार्क लेबर कॅम्प रूम, हडपसर, पुणे )अशी चोरीचा ऐवज विक्री करणाऱ्यांची नावे आहेत़. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दि़ १७ ऑगस्ट रोजी वाघोली येथील पायगुडे वस्तीत घरफोडी झाली होती़. यामध्ये १० हजार रोख व दोन मोबईल लंपास केले होते़ दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकानेही परिसरात घडलेल्या घरफोड्यांचाचा तपास करण्यास सुरुवात केली आहे़. सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांना घरफोडी करणारे राहुल व भरत हे दोघे रविवारी दुपारी वाघोली येथील आव्हाळवाडी फाटा येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती़. त्यानुसार पोलीस निरीक्षक गुंड व त्यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार दत्तात्रय गिरीमकर, पोलीस हवालदार उमाकांत कुंजीर, सचिन गायकवाड, विजय कांचन, जनार्दन शेळके, राजु मोमीन, धिरज जाधव, अक्षय नवले आदींनी परिसरात गस्त वाढवली़.

त्यानंतर आव्हाळवाडी फाटा येथे सापळा रचत राहुल व भरत या दोघांनाही ताब्यात घेतले़ त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी पायगुडे वस्ती येथे घरफोडी केल्याची कबुली दिली. चोरीचा ऐवज विनोंद सिंग व उपेंद्र राम यांच्या मदतीने विकल्याचेही त्यांनी प्राथमिक तपासात सांगितले़ त्यामुळे सिंग आणि राम यांनाही अटक करण्यात आली़. 

राहुलवर आठ तर भरतवर चार गुन्हे राहूल गायकवाड व भरत स्वामी हे दोघेही सराईत असून त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद आहेत़ यातील राहुलवर विमानतळ पोलीस ठाणे, पुणे शहर, वारजे माळवाडी पोलीस ठाणे, भोसरी पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड आयुक्तालय, बंंडगार्डन पोलीस ठाणे येथे आठ तर भरतवर पुुणे शहरातील येरवडा पोलीस ठाणे, फरासखाना पोलीस ठाणे, विमानतळ पोलीस ठाण्यात व लोणीकंद पोलीस ठाणे पुणे ग्रामीण येथे ४ गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून परिसरातील अनेक घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे़. 

 

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस