गुंड गजानन मारणेला मदत करणे भोवले; माजी खासदार संजय काकडे यांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 13:43 IST2021-04-21T13:26:50+5:302021-04-21T13:43:49+5:30

बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Former MP Sanjay Kakade was arrested for helping to kill Gajanan | गुंड गजानन मारणेला मदत करणे भोवले; माजी खासदार संजय काकडे यांना अटक

गुंड गजानन मारणेला मदत करणे भोवले; माजी खासदार संजय काकडे यांना अटक

ठळक मुद्देतीनशे अलिशान गाड्यासह मुंबई -पुणे एक्सप्रेसवेवर काढली भव्य मिरवणुक

पुणे: तळोजा तुरुंगातून सुटलेल्या गुंड गजानन मारणे याची भव्य मिरवणुक काढण्याच्या प्लॅनिगमध्ये सहभाग घेऊन गुन्हेगारांना मदत केल्याप्रकरणी माजी खासदार संजय काकडे यांना पुणे पोलीस दलाच्या गुन्हे शाखेने आज अटक केली, अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात संजय काकडे यांना अटक करुन आज न्यायालयात नेण्यात आले आहे.

 गजानन मारणे याची तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर सुमारे ३०० अलिशान गाड्यासह मुंबई -पुणे एक्सप्रेसवेवर भव्य मिरवणुक काढून महाराष्ट्राचा किंग कोण अशा घोषणा देण्यात आल्या होत्या.  एक प्रकारे त्याने सर्व पोलीस दलालाच आव्हान दिले होते. त्यानंतर पुणे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे ग्रामीण पोलीस दलाने त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल केले होते. पुणे ग्रामीण पोलिसांनी गजानन मारणे याच्याविरुद्ध स्थानबद्धतेचा आदेश मिळवून त्याला सातारा जिल्ह्यातील मेढा येथे २ मार्च रोजी अटक केली होती. 

शहरातील संघटित गुन्हेगारी मोडित काढण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सर्व बड्या गँगस्टारांवर कारवाई सुरु केली आहे. मोक्का, तडीपारी, स्थानबद्धता अशा विविध मार्गाने त्यांच्यावर कारवाई केली आहे. आता या गँगस्टरांना मदत करणार्‍या व त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यांची चौकशी सुरु करण्यात आली होती. त्या अनुषंगाने गेल्या महिन्यात माजी खासदार संजय काकडे यांना आज पोलीस आयुक्तालयात बोलविण्यात आले होते. 

गेल्या महिन्यात पोलीस आयुक्तालयात दुपारी अनेक आलिशान गाड्या आल्याने सर्वांचे लक्ष त्याकडे वेधले गेले. संजय काकडे यांना बर्‍याच वेळ बसवून ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली. या चौकशीतून पोलिसांनी त्यांना योग्य तो इशारा दिल्याचे सांगण्यात येत आहे. शहरातील संघटित गुन्हेगार टोळ्यांना आश्रय देणारे तसेच त्यांना मदत करणार्‍यांविरुद्ध पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. गजानन मारणे याच्यासहीत शहरातील सर्व प्रमुख गुन्हेगार व त्यांच्या टोळ्यांवर मोक्का, एमपीडीएखाली अटक करुन तुरुंगात पाठविण्यात आले आहे.

Web Title: Former MP Sanjay Kakade was arrested for helping to kill Gajanan