शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

माजी महापौर कमल व्यवहारे यांची काँग्रेसमध्ये घरवापसी; पक्षाविरोधात लढूनही निलंबन मागे

By राजू इनामदार | Updated: June 19, 2025 19:51 IST

नगरसेवक पदापासून ते महापौर, महिला प्रदेशाध्यक्ष अशा पदांवर काँग्रेसमध्येच काम केले आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाचे धोरण पटले नाही म्हणून म्हणून पक्ष सोडला. आता ते कारणच राहिलेले नाही.

पुणे : विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केलेल्या माजी महापौर कमल व्यवहारे यांच्यावरचे निलंबन पक्षाने मागे घेतले आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत मुंबईत गुरुवारी झालेल्या बैठकीत त्यांना पक्षात प्रवेश देण्यात आला. याच निवडणुकीतील अन्य बंडखोरांचा विषय मात्र पक्षाने प्रलंबित ठेवला आहे. माजी महापौर कमल व्यवहारे यांचे निलंबन मागे घेण्यात आले.

काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या पुढाकाराने कमल व्यवहारे यांचा पक्षप्रवेश झाला. शिंदे म्हणाले, कसबा विधानसभा मतदार संघातील प्रभागात कमल व्यवहारे यांना मानणारा मोठा मतदार आहे. बँकिंग, शिक्षण आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यवहारे यांची सर्व राजकीय कारकीर्द काँग्रेस पक्षातच झालेली आहे. त्यामुळे त्यांच्यावरील शिस्तभंग कारवाई मागे घेण्यात आली.

व्यवहारे म्हणाल्या, नगरसेवक पदापासून ते महापौर, महिला प्रदेशाध्यक्ष अशा पदांवर काँग्रेसमध्येच काम केले आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाचे धोरण पटले नाही म्हणून म्हणून पक्ष सोडला. आता ते कारणच राहिलेले नाही, ज्यांना उमेदवारी दिली त्यांनी पक्ष सोडला, मी घेतलेले आक्षेप खरे ठरले, त्यामुळे पक्ष प्रवेशाचा निर्णय घेतला. आता महापालिका निवडणुकीत पक्षासाठी प्रचार करणार आहे.

दरम्यान, या निवडणुकीत माजी उपमहापौर आबा बागूल तसेच छावणी मंडळाचे माजी नगरसेवक मनिष आनंद यांनीही काँग्रेसमधून बंडखोरी केली होती. प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी पुण्यात पत्रकारांबरोबर बोलताना, ज्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवली त्यांच्या पक्षप्रवेशाच्या बाबतीत लवकर निर्णय घेऊ, तर ज्यांनी थेट काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवली त्यांच्याबाबतीत वेळ लागेल असे सांगितले होते. कमल व्यवहारे व मनिष आनंद यांनी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवली होती, तर बागूल यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराविरोधात.

तरीही व्यवहारे यांच्या प्रवेशाचा निर्णय आधी झाला आहे, तर आनंद यांचा प्रलंबित आहे. बागूल यांचा तर विचारच व्हायला तयार नाही. त्यांनी विधानसभा निवडणूक झाल्यावर लगेचच आपल्या बंडखोरीमुळे पक्षाचे नाव मतदारसंघात कायम राहिले असा दावा करून निलंबन मागे घेण्याची मागणी केली होती. मात्र त्याचा विचार झालेला दिसत नाही.

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBJPभाजपाravindra dhangekarरविंद्र धंगेकरEknath Shindeएकनाथ शिंदे