शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

डीपीविरोधात माजी महापौर आक्रमक

By admin | Updated: October 17, 2015 01:13 IST

शहराच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा तयार करताना शासन नियुक्त समितीने सर्व ३९० आरक्षणे उठवली. शहरहिताच्या दृष्टीने हा अत्यंत चुकीचा निर्णय असल्याने याविरोधात

पुणे : शहराच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा तयार करताना शासन नियुक्त समितीने सर्व ३९० आरक्षणे उठवली. शहरहिताच्या दृष्टीने हा अत्यंत चुकीचा निर्णय असल्याने याविरोधात सर्व माजी महापौर एकत्र येऊन रस्त्यावर उतरणार आहेत. ज्येष्ठ माजी महापौर भाई वैद्य यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सकाळी ११ वाजता महापालिकेत धरणे आंदोलन केले जाणार आहे. शहराचा डीपी तयार करण्याचे काम गेल्या ७ वर्षांपासून सुरू आहे. नव्या डीपीमध्ये उद्याने, शाळा, हॉस्पिटल, बसस्थानक यासह अनेक नागरी सुविधांसाठी ३९० जागा आरक्षित करण्यात आल्या होत्या. या आरक्षणांवर ८० हजार हरकती पुणेकरांनी नोंदविल्या. एका नियोजन समितीने या हरकतींवर सुनावणी घेऊन त्याचा अहवाल महापालिकेकडे सादर केला. मुख्य सभेमध्ये डीपीला मान्यता देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना अचानक राज्य शासनाने डीपी महापालिकेकडून काढून स्वत:च्या ताब्यात घेतला.विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली. या समितीने कोणताही अभ्यास न करता नागरी सुविधांसाठी आरक्षित केलेली सर्व आरक्षणे उठविली. शहरामध्ये मोकळ्या जागा ठेवून शहराचा विकास करण्यासाठी आरक्षण अत्यंत महत्त्वाची असतात, मात्र समितीने सरसकट आरक्षणे उठविण्याचा निर्णय घेतल्याने त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शहरहिताच्यादृष्टीने हे योग्य नसल्याने याविरोधात सर्व माजी महापौरांनी एकत्र येऊन त्याला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेतील महात्मा फुले पुतळ्याजवळ मंगळवारी सकाळी ११ वाजता त्याविरोधात धरणे आंदोलन केले जाणार आहे. आरक्षणे उठविताना पारदर्शकता ठेवण्यात आली नसल्याचा आरोप माजी महापौरांच्या वतीने केला जात आहे.याबाबत माजी महापौर अंकुश काकडे यांनी सांगितले की, ‘‘राज्य शासनाने नियुक्त केलेल्या समितीने आरक्षणे उठविण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत चुकीचा आहे. त्यामुळे त्याला सर्व माजी महापौरांकडून एकत्रित विरोध आहे.’’