शहरं
Join us  
Trending Stories
1
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
2
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
3
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
4
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
5
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
6
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
7
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
8
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
9
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
10
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
11
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
12
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
13
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
14
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
15
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
16
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
17
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
18
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
19
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
20
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे माजी सचिव प्रल्हाद सावंत यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2018 9:20 PM

पुण्याला क्रीडानगरी म्हणून ओळख मिळवून देण्यात मोलाचे योगदान देणारे महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे माजी सचिव आणि राज्याच्या क्रीडा क्षेत्रातील ज्येष्ठ संघटक प्रल्हाद सावंत यांचे गुरूवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.

पुणे : पुण्याला क्रीडानगरी म्हणून ओळख मिळवून देण्यात मोलाचे योगदान देणारे महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे माजी सचिव आणि राज्याच्या क्रीडा क्षेत्रातील ज्येष्ठ संघटक प्रल्हाद सावंत यांचे गुरूवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे अ‍ॅथलेटिक्ससह राज्याच्या क्रीडा क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

69 वर्षीय सावंत यांना दुपारी पत्रकार नगर येथील राहत्या घरी हृदयविकाराचा धक्का आला. त्यांना सेनापती बापट रस्त्यावरील रत्ना मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सावंत हे अविवाहित होते. त्यांच्यामागे बहीण विजया मोरे, भाचा आंतरराष्ट्रीय सागरी जलतरणपटू रोहन मोरे, पुतणी बुलडाण्याच्या उपजिल्हाधिकारी गौरी सावंत आणि डॉ. दिव्या सावंत असा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच क्रीडा क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हॉस्पिटल तसेच त्यांच्या घराकडे धाव घेतली. त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी नवी पेठेतील वैकुंठधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

राज्यात सर्वत्र तसेच राज्याबाहेरही अफाट जनसंपर्क असलेल्या सावंत यांनी तब्बल 35 वर्षांपेक्षा जास्त काळ क्रीडा पत्रकार म्हणून ठसा उमटवला. पुण्याला देशाच्याच नव्हे तर, जगाच्या क्रीडाक्षेत्रात दखल घेण्याजोगे नाव मिळवून देणारी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन सुरू करण्याचा मान सावंत यांनाच जातो. 2008 मध्ये पुण्यात झालेली राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा सावंत यांच्या उत्कृष्ट संयोजनामुळेच यशस्वी ठरली होती. कविता राऊत, ललिता बाबर यांच्यासारख्या ग्रामीण भागातील खेळाडूंनी आॅलिम्पिकपर्यंत मजल मारण्यात सावंत यांनी मोलाचे सहकार्य केले होते. राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक खेळाडूंना त्यांनी घडविले. अ‍ॅथलेटिक्समध्ये जिल्हास्तरापासून ते राष्ट्रीय संघटनेत विविध पदावर त्यांनी प्रभावीपणे कार्य केले. पुणे हौशी अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे सचिव, महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे सचिव, महाराष्ट्र आॅलिम्पिक संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष, भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे उपाध्यक्ष अशी विविध पदे त्यांनी भूषविली.

टॅग्स :Sportsक्रीडाPuneपुणे