खुनाची सुपारी देणार्‍या पुणे कॅन्टोंमेंट भागातील भाजपच्या माजी नगरसेवकावर ‘मोक्का’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 03:29 PM2021-07-28T15:29:26+5:302021-07-28T16:17:35+5:30

नगरसेवकाने पूर्ववैमनस्यातून विरोधी टोळीतील बबलु गवळीच्या खुनाची सुपारी दिली होती

Former BJP corporator in Pune cantonment area charged with murder | खुनाची सुपारी देणार्‍या पुणे कॅन्टोंमेंट भागातील भाजपच्या माजी नगरसेवकावर ‘मोक्का’

खुनाची सुपारी देणार्‍या पुणे कॅन्टोंमेंट भागातील भाजपच्या माजी नगरसेवकावर ‘मोक्का’

Next
ठळक मुद्देविवेक यादव आणि त्याच्या टोळीने लोकांमध्ये दहशत पसरवून टोळीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी गुन्हे करीत असल्याचे तपासात समोर

पुणे : पूर्ववैमनस्यातून विरोधी टोळीतील बबलु गवळीच्या खुनाची सुपारी देणारा भाजपचा माजी नगरसेवक विवेक यादव व त्याच्या साथीदारांवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे. विवेक यादव हा भाजपचा पुणे कॅन्टोंमेंटचा माजी उपाध्यक्ष व माजी नगरसेवक आहे.

बबलु गवळी याने २०१६ च्या गणशोत्सव विसर्जन मिरवणुकीत विवेक यादव याच्यावर गोळीबार करुन गंभीर जखमी केले होते. त्याचा बदला घेण्यासाठी विवेक यादव याने शिक्षा भोगत असलेला व सध्या कोरोनामुळे पॅरोलवर कारागृहातून बाहेर आलेल्या राजन राजमणी याला सुपारी दिली होती. राजमणी व त्याचा साथीदार इब्राहिम शेख यांच्याकडे शस्त्रे असल्याची माहिती मिळाल्याने कोंढवा पोलीस ठाण्याचे तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे व त्यांच्या साथीदारांनी दोघांना पकडून त्यांच्याकडून ३ पिस्तुले व ७ काडतुसे, रोकड जप्त केली होती. 

राजन याच्याकडील मोबाईलमधील व्हॉटसअ‍ॅपच्या संभाषणावरुन विवेक यादव याने बबलु गवळी याच्या खुनाची सुपारी दिली होती. त्यासाठीच त्याने ही शस्त्रे पुरविली असल्याचे उघड झाले होते. राजमणी याला अटक केल्याचे समजल्यावर विवेक यादव हा फरार झाला होता. त्याला कोंढवा पोलिसांनी गुजरात -राजस्थान बॉर्डरवर अटक केली होती. विवेक यादव याने त्याच्या साथीदारांबरोबर मिळून संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली आहे.

टोळी प्रमुख विवेक यादव याने व त्याच्या संघटित टोळीने लोकांमध्ये दहशत पसरवून टोळीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी गुन्हे करीत असल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार या गुन्ह्यात मोक्का कलमाचा समावेश करण्यात आला आहे. सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Former BJP corporator in Pune cantonment area charged with murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app