वन विभागाची मोठी कारवाई; पहाडी पोपटांची तस्करी, दोघांना कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 10:07 IST2025-02-12T10:04:57+5:302025-02-12T10:07:30+5:30
वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

वन विभागाची मोठी कारवाई; पहाडी पोपटांची तस्करी, दोघांना कोठडी
पुणे : शहरामध्ये अनेक प्राणी, पक्ष्यांची तस्करी सुरू असल्याचे दिसून येत आहे. वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन करून पहाडी पोपटांची (अलेक्झान्ड्रीन पॅराकिट) तस्करी करण्यात येत होती. तस्करी करणाऱ्यांवर सीमा शुल्क विभाग आणि वन विभागाने पुणे रेल्वे स्थानक परिसरात कारवाई केली आणि दोघांना अटक केली. त्या दोघांना २१ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. दोघांकडील पोपट ताब्यात घेऊन त्यांना पुन्हा निसर्गात सोडण्यात आले. जे पोपटांची तस्करी करत होते, त्यांची नावे शेख सरफराज शेख खदीर आणि सचिन सुजित रोजोरिया अशी आहेत. त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
पुणे रेल्वे स्टेशनच्या परिसरात पोपटांच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार होणार असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाला मिळाली होती. त्यामुळे त्यांनी शेख सरफराज शेख खदीर यास पोपटांसह ताब्यात घेतले. तपासादरम्यान सचिन सुजित रोजोरिया या आरोपीचेही नाव समोर आले. त्यानंतर वन विभागाने सांगवी फाट्यावर सापळा रचला आणि सचिन रोजोरिया यास ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत तोदेखील तस्करीत सहभागी असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्याच्यावरही गुन्हा दाखल केला. या प्रकरणी दोन्ही आरोपींना सोमवारी लष्कर येथील प्रथम न्यायदंडाधिकारी न्यायालयाने २१ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दोघांची येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली. ही कारवाई सहायक वनसंरक्षक मंगेश ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश वरक यांच्या नेतृत्वाखाली केेली. यात वनपरिमंडळ अधिकारी वैभव बाबर, प्रमोद रासकर, वनरक्षक काळूराम कड, अनिल राठोड, मधुकर गोडगे, ओंकार गुंड, विनायक ताठे, रमेश शिंदे यांनी सहभाग घेतला.
वन विभागाने रचला सापळा
पुणे रेल्वे स्टेशनच्या परिसरात पोपटांच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार होणार असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाला मिळाली होती. त्यामुळे त्यांनी शेख सरफराज शेख खदीर यास पोपटांसह ताब्यात घेतले. तपासादरम्यान सचिन सुजित रोजोरिया या आरोपीचेही नाव समोर आले. त्यानंतर वन विभागाने सांगवी फाट्यावर सापळा रचला आणि सचिन रोजोरिया यास ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत तोदेखील तस्करीत सहभागी असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्याच्यावरही गुन्हा दाखल केला.