करमाळाचा दादा असल्याचे सांगत १८ वर्षीय मुलीसोबत जबरदस्ती;तरुणासह त्याच्या मैत्रिणीवर गुन्हा दाखल
By नितीश गोवंडे | Updated: January 10, 2024 14:08 IST2024-01-10T14:07:22+5:302024-01-10T14:08:05+5:30
शरीर संबंधाची मागणी करुन जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला

करमाळाचा दादा असल्याचे सांगत १८ वर्षीय मुलीसोबत जबरदस्ती;तरुणासह त्याच्या मैत्रिणीवर गुन्हा दाखल
पुणे: आजारी असल्याचा बहाणा करुन मैत्रिणीला बोलवून घेतले. त्यानंतर तिला एका हॉटेलमध्ये नेत एका व्यक्तीसोबत फिजिकल रिलेशन करण्यास सांगितले. त्याला तरुणीने त्याला नकार दिला. त्यावेळी आरोपी युवकाने तरुणीसोबत गैरवर्तन करुन तिचा विनयभंग केला तसेच तिला मी करमाळाचा दादा आहे अशी धमकी दिली. याप्रकरणी एका तरूणीसह ३१ वर्षीय तरुणावर समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी वारजे येथील १८ वर्षीय तरुणीने समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून सतीश अंकुश काळे (३१) आणि १९ वर्षीय तरुणीवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सोमवारी (दि. ८) रात्री सव्वा नऊ ते मंगळवारी (दि. ९) सकाळी साडेपाचच्या दरम्यान सोमवार पेठेतील एका हॉटेलमध्ये घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी १९ वर्षीय तरुणी या दोघी मैत्रिणी आहेत. आरोपी मैत्रिणीने पीडित तरुणीला फोन करुन तब्येत बरी नसल्याचे सांगून कोंढवा येथे बोलवून घेतले. त्यानंतर आरोपी, तिची बहीण आणि इतर तीन मित्रांसह फिर्यादी यांना घेऊन सोमवार पेठेतील एका हॉटेलमध्ये आले. पीडित मुलगी हॉटेलच्या एका रूम मध्ये थांबली होती. त्यावेळी आरोपी तरुणीने फिर्यादी तरूणीला सतीश काळे याच्यासोबत फिजिकल रिलेशन करण्यास प्रवृत्त केले. मात्र फिर्यादी तरुणीने त्याला विरोध केला असता आरोपी काळे याने अश्लील बोलून फिर्यादी सोबत गैरवर्तन केले. तसेच शरीर संबंधाची मागणी करुन जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी यांनी त्याला नकार दिला असता आरोपी सतीश याने मी करमाळाचा दादा आहे अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कुटे या करत आहेत.