शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

आळेफाटा येथे २६ विद्याथिर्नींना अन्नातून विषबाधा 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2018 4:19 PM

दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेअंतर्गत राजुरी येथे प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या २६ विद्यार्थ्यांनीना शुक्रवारी सकाळी घेतलेल्या नाश्त्याच्या अन्नातून विषबाधा झाली.

ठळक मुद्दे२६ विद्यार्थ्यांनींना मळमळ व पोटदुखीचा त्रासदीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजनेंतर्गत प्रशिक्षण

आळेफाटा/राजुरी : दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेअंतर्गत राजुरी येथे प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या २६ विद्यार्थ्यांनीना शुक्रवारी सकाळी घेतलेल्या नाश्त्याच्या अन्नातून विषबाधा झाली. राजुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात संबंधितांवर तातडीने उपचार करण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजुरी येथे एका प्रायव्हेट लिमीटेड कंपनीच्या वतीने सहयाद्री व्हँली आभियांत्रिकी महाविद्यालयात केंद्र शासनाच्या दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेअंतर्गत मुला मुलींना प्रशिक्षण देण्यात येत आहे.   शुक्रवारी नेहमीप्रमाणे प्रशिक्षण घेण्यासाठी आल्यानंतर काही वेळाने यातील २६ विद्यार्थ्यांनींना मळमळ व पोटदुखी असे त्रास होऊ लागले. तातडीने त्यांना राजुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. यामधील बारा मुलींना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले. तर एका मुलीला उपचारासाठी आळेफाटा येथे तर उर्वरित मुलींना उपचारानंतर सायंकाळी घरी सोडण्यात आल्याचे व त्यांना दुषित अन्नामुळे पोटदुखी व मळमळ असा त्रास झाल्याचे राजुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी रामप्रसाद धायकर यांनी सांगितले.   याबाबत सह्याद्री व्हॅली अभियांत्रिकी महाविद्यालयाचे उपप्राचार्य भूषण बो-हाडे यांनीही संबंधित विद्यार्थिंनींना पोटदुखी व अवेळी जेवणामुळे असा त्रास झाला असावा असे सांगत या विद्यार्थिनी आमच्या महाविद्यालयाच्या नसून दुरगावच्या आहे. त्या येथे केवळ दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजनेंतर्गत प्रशिक्षण घेण्यासाठी आल्या आहेत.

टॅग्स :narayangaonनारायणगावCrime Newsगुन्हेगारीStudentविद्यार्थीhospitalहॉस्पिटल