पुणे : शहरातील शासकीय वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांसाठी जेवणाची सुविधा सुरळीत सुरू आहे. मात्र, शहरातील मध्यवर्ती पेठा व उपनगरातील खासगी वसतिगृहांना विविध अडचणींना सामोरे जात असल्याचे शहरात चित्र आहे. विशेषतः गॅस तुटवड्यामुळे अनेक खासगी वसतिगृहचालकांना स्वयंपाक व्यवस्था कोलमडली आहे. अनेक ठिकाणी जेवणाची व्यवस्था विस्कळीत होत असल्याची अनेक तक्रार आहेत.
यावर विविध संघटनांच्या नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले आहे; मात्र यावर काही ठोस उपाययोजना करण्यात आले नाही. अनेक व्यावसायिकांसह विद्यार्थीवर्गात नाराजी पसरली आहे. तसेच काही वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना बाहेरून जेवण मागवावे लागत असून त्यामुळे त्यांचा अतिरिक्त खर्चही वाढत आहे. खासगी वसतिगृहचालकांनी प्रशासनाने गॅस पुरवठ्याचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी केली आहे.
शासकीय वसतिगृहांना शासकीय यंत्रणेमार्फत गॅस सिलिंडरचा पुरवठा नियमित होत असल्याने तेथील विद्यार्थ्यांना जेवणाची सुविधा वेळेवर मिळत आहे. समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुढे यांनी सर्वांना सूचना दिल्या असून सर्व वसतिगृहातील गृहप्रमुख याकडे लक्ष देत आहेत. जेवणाची सुविधा सुरळीत सुरू आहे.- विशाल लोंढे, सहायक आयुक्त, समाजकल्याण, पुणे.
मध्यवर्ती पेठा भागात सर्वाधिक विद्यार्थी संख्या असून खासगी वसतिगृह आहेत. मात्र, विद्यार्थी मेसवर जेवण करतात. मेसवाल्यांनी पैसे वाढवले, तर नाश्त्याचा खर्चही वाढवला आहे. पूर्वी २० रुपयांचा असणारा नाश्ता ३० रुपये, तर शाकाहारी थाळी ७० रुपयांवरून १०० रुपये केली आहे. सामान्य घरातील विद्यार्थ्यांना हा खर्च परवडत नाही. तर घरी जाण्याची वेळ आली आहे. मात्र, परीक्षा तोंडावर आल्याने येथे राहिल्याशिवाय पर्याय नाही. - गणेश मोहिते, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी.
शासकीय वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांसाठी जेवणाची सुविधा आहे. मात्र, खासगी वसतिगृहांमध्ये गॅस तुटवड्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. परिणामी अनेक विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या सोयीवर परिणाम झाल्याचे शहरातील मध्यवर्ती पेठा व उपनगरात जेवणाबाबचे वेगळे चित्र आहे. काही विद्यार्थ्यांना वरण-भात खाण्याची वेळ आली आहे. - खासगी व्यावसायिक
Web Summary : Pune government hostels have food; private ones struggle with gas shortages. Students face rising meal costs, forcing some to consider leaving. The administration is urged to resolve the gas supply issue quickly.
Web Summary : पुणे के सरकारी छात्रावासों में भोजन उपलब्ध है, जबकि निजी छात्रावास गैस की कमी से जूझ रहे हैं। छात्रों को भोजन की बढ़ती लागत का सामना करना पड़ रहा है, जिससे कुछ लोग छोड़ने पर विचार कर रहे हैं। प्रशासन से गैस आपूर्ति का मुद्दा तुरंत हल करने का आग्रह किया गया है।