शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

आळंदीच्या पाणीप्रश्नासाठी जलसंपदाकडे पाठपुरावा !

By admin | Updated: March 4, 2015 23:37 IST

आळंदीच्या पाणीप्रश्नाबाबत आज जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतली.

पुणे : आळंदीच्या पाणीप्रश्नाबाबत आज जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतली. भामा आसखेडमधून पुण्याला जाणाऱ्या पाइपलाइनमधून पाणी मिळण्यासाठी ‘जेएनएनआरयूएम’ व जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा करून मंजुरी मिळवू, असे सांगितले. आळंदीच्या पाणीप्रश्नाबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात पुणे महापालिका, पिंपरी महापालिका व आळंदी नगरपरिषद यांची बैठक झाली. या बैठकीला पुणे महापालिकेचे महापौर दत्तात्रय धनकवडे, कार्यकारी अभियंता गेडाम, पिंपरी महापालिकेचे नगरअभियंता कांबळे, आळंदी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, नगरसेवक राजेंद्र गिलबिले, प्रदीप नवले, रमेश गोगावले, मुख्याधिकारी विनायक औंधकर, वारकरी प्रतिनिधी राजाभाऊ चौपदार आदी उपस्थित होते. पुणे महानगरपालिकेने आळंदी नगरपालिकेला काही मुद्दे उपस्थित करून, आळंदीला या पाइपलाइनमधून पाणी देता येऊ शकत नसल्याचे कळविले आहे. ते मुद्दे आळंदी नगरपालिकेने या वेळी खोडून काढले. मुळात भामा आसखेडमधून आळंदीसाठी 0.१५ टक्के पाणी राखीव आहे. पुणे महापालिकेने पाणी दिल्यास वाढीव कोटा म्हणून त्यांना पाणी मिळेल. आळंदी हे तीर्थक्षेत्र व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने, विशेष बाब म्हणून पाणी देण्यासाठी सरकारकडे प्रयत्न केला जावा. तसेच, प्रस्तूत पाइपलाइनमधून पाणी तांत्रिकदृष्ट्या अशक्य असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. मात्र, पुण्यासाठी १६00 एम. एम. व्यासाच्या पाइपलाइन पाणी वाहून नेणार आहे. मात्र, कमी व्यासाच्या पाइपलाइनमधून नियंत्रित वॉल्व्हद्वारे मीटर लावून आळंदीत पाणी दिल्यास कुठलाही अडथळा येऊ शकत नसल्याचे सांगितले.जिल्हाधिकाऱ्यांनी जलसंपदा विभागाच्या परवानगीसाठी प्रयत्न करू, असे सांगत, तांत्रिक मुद्यांचा विचार करून पाणी देता येईल का, याबाबत पुणे महापालिकेने विचार करावा. पुन्हा याबाबत बैठक घेऊ, असे सांगितले. (प्रतिनिधी)तर रस्त्यावर उतरू४बैठकीत रोहिदास तापकीर व राजाभाऊ चौपदार यांनी ठोस भूमिका घेत, ‘जर आम्हाला पाणी मिळाले नाही, तर पाइपलाइनचे काम होऊ देणार नाही. तसेच आळंदीकर नागरिक व वारकरी रस्त्यावर उतरतील,’ असा इशारा दिला.