शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक फाटा उड्डाणपुलावर उडतोय गोंधळ

By admin | Updated: February 13, 2015 05:03 IST

कासारवाडी येथील भारतरत्न जे.आर.डी. टाटा दुमजली उड्डानपुलावरील दिशादर्शक फलक दिसत नसल्याने वाहनचालकांचा गोंधळ उडत आहे.

पिंपरी : कासारवाडी येथील भारतरत्न जे.आर.डी. टाटा दुमजली उड्डानपुलावरील दिशादर्शक फलक दिसत नसल्याने वाहनचालकांचा गोंधळ उडत आहे. दिशाभूल होऊन वाहने चूकीच्या मार्गाने ये- जा करावी लागते. त्यामुळे अनेकांना दूर अंतरावरुन वळसा घालून ये-जा करण्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेषता नव्याने या मार्गावर आलेल्या वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. पुणे- मुंबई जुना महामार्ग आणि पुणे- नाशिक महामार्गाला छेद देणारा कासारवाडीतील नाशिक फाटा चौकात हा दुमजली उड्डान पुल नव्यानेच उभारला आहे. शहरातील सर्वांत उंच आणि अधिक लांबीचा असे या पुलाचे वैशिष्टये आहे. कासारवाडीकडून भोसरीकडे जाणारा आणि रस्ता, नदी आणि लोहमार्गावरुन जाणारा भोसरी आणि पिंपळे गुरव असे दोन पुल आहेत. ग्रेडसेपरेटरमधून दापोडीहून कासारवाडीत आल्यानंतर भोसरीकडे जाण्यासाठी पुल सुरू होतो. मात्र, तेथे लावलेला दिशादर्शक फलक खूपच छोटा आहे. वेगात असलेल्या वाहनांना तो दिसत नाही. त्यामुळे वाहने थेट पिंपरीकडे जातात. त्यामुळे त्याची फसगत होते. थेट पुलावर न गेल्याने चौकातील सिग्नलला थांबून वळण घेऊन भोसरीकडे जाण्याची वेळ येते. पिंपळे गुरव-भोसरी पुलाकडे ये- जा करण्यासाठी कासारवाडी रेल्वे स्थानकाच्या मागील बाजूने उपरस्ता आहे. मात्र, जाणे आणि येण्याच्या माार्गवर दिशादर्शक फलक दर्शनी आणि मोठ्या आकारात नसल्याने कोठून वळण घ्यायचे हे समजत नाही. यामुळे चालक वाहन चुकीच्या मार्गाने पुढे जातो. वाहने विरुद्ध दिशेने वाहने जातात. यामुळे अपघात होण्याचा धोका आहे. उपरस्त्याचे वळण अधिक वर्तुळाकार असल्याने टर्न घेताना धांदल उडते. उपरस्त्याचे कठडे अधिक उंच असल्याने पलीकडील वाहने दृष्टिस पडत नाही. पिंपळे गुरवहून कासारवाडीत जाण्यासाठी उपरस्ता आहे. तो न समजल्याने भोसरी मार्गावरील वाहतूक पोलीस कक्षापर्यत जाऊन पुन्हा मागे वळून यावे लागते. त्यात सुमारे दीड ते दोन किलोमीटरचा वळसा पडतो. या पुलावरुन पिंपरीकडे जाण्यासाठी अवजड वाहनांना वाहतूक पोलीस कक्षापर्यतच गेल्याशिवाय पर्याय राहत नाही. तेथून वळसा घ्यावा लागतो.