शहरं
Join us  
Trending Stories
1
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगालमध्ये आणखी एका भाजपा उमेदवाराच्या कारवर हल्ला
3
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
4
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, फोडल्या काचा
5
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
6
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
7
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
8
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
9
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
10
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
11
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
12
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
13
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
14
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
15
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
16
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
17
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
18
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
19
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
20
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
Daily Top 2Weekly Top 5

चेहऱ्यावर फुलले हास्य

By admin | Updated: July 6, 2015 04:27 IST

पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांच्या आदेशानुसार बेपत्ता झालेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यात ‘मुस्कान आॅपरेशन’ सुरू करण्यात आले आहे.

बारामती : पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांच्या आदेशानुसार बेपत्ता झालेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यात ‘मुस्कान आॅपरेशन’ सुरू करण्यात आले आहे. बारामती शहर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत मुस्कान आॅपरेशन पथकाने ४ बेपत्ता मुलांचा शोध लावून त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. या मुलांना गुन्हेगारीपासून रोखण्यात पोलिसांना यश आले आहे. मुलांना ताब्यात घेतल्यानंतर आई-वडिलांच्या चेहऱ्यावर हास्य खुलले होते. यासंदर्भात पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. आॅपरेशन मुस्कान पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोसले, अमित बनकर, पांडुरंग गोरवे या पथकाने हे यश मिळविले आहे. गुणवडी परिसरातील ३० फाटा येथील नववीमध्ये शिक्षण घेणारा अल्पवयीन मुलगा गेल्या ५ दिवसांपासून बेपत्ता होता. शाळेत जातो, असे सांगून हा मुलगा निघून गेला होता. त्याचे अपहरण झाल्याचा संशय वडिलांनी व्यक्त केला होता. दोन दिवसांनी पुण्याहून त्याने पालकांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी या मुलाला ताब्यात घेऊन आई-वडिलांच्या स्वाधीन केले. त्याच्या आई-वडिलांचा शेती आणि दुधाचा व्यवसाय आहे. दुसरा मुलगा माळेगाव बुद्रुक संभाजीनगर येथील आहे. याचे वय १७ वर्षे असून दोन वर्षांपासून तो बेपत्ता होता. शहरातील भुरट्या चोऱ्यांमध्ये त्याचा सहभाग होता. बेपत्ता असलेल्या या मुलाचा पोलिसांना पेट्रोलिंग करताना बारामती शहरात नुकताच शोध लागला. आठवी अनुत्तीर्ण असलेल्या मुलाची गुन्हेगारीच्या दिशेने पावले वळली होती. पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याचे समुपदेशन केले. याशिवाय येथील एका निवासी शिक्षण संस्थेतून पळून गेलेल्या विद्यार्थ्याचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. हा मुलगा अनाथ आहे. बारामती शहरात त्याचा वावर होता. (प्रतिनिधी)----------> आमराई परिसरातील १९ वर्षीय युवक वडील रागवतात म्हणून कोल्हापूर येथे निघून गेला होता. कोल्हापूर येथील कंपनीत त्याने नोकरी देखील केली. मात्र, राग शांत झाल्यावर हा युवक पुन्हा बारामतीत आला. मात्र, पोलिसांना तो परत आल्याबाबत त्याच्या कुटुंबियांनी माहिती दिली नव्हती, असे पोलिसांनी सांगितले. ४दरम्यान, २००५ पासून बारामती शहर पोलीस ठाण्यात ४६ ‘मिसिंग’च्या तक्रारी दाखल आहेत. त्यापैकी चौघां जणांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे, असे पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक भोसले यांनी सांगितले.