शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
2
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
3
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
4
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
5
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
6
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
8
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
9
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
10
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
11
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
12
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
13
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
14
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
15
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
16
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
17
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
18
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
19
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
20
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्यावरून झाली झाडाझडती

By admin | Updated: August 24, 2015 03:10 IST

शहरातील कचऱ्याचे उरुळी व फुरसुंगी येथील ओपन डंपिंग ७ आॅक्टोबरपर्यंत बंद करावे लागणार आहे. ही डेडलाईन अवघ्या दीड महिन्यावर आली, तरी महापालिकेच्या

पुणे : शहरातील कचऱ्याचे उरुळी व फुरसुंगी येथील ओपन डंपिंग ७ आॅक्टोबरपर्यंत बंद करावे लागणार आहे. ही डेडलाईन अवघ्या दीड महिन्यावर आली, तरी महापालिकेच्या प्रशासनाकडून आवश्यक तयारी करण्यात आली नसल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पारा चढलेल्या पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कचरा समस्येवरून धारेवर धरले. शहरातील कचऱ्याच्या ज्वलंत प्रश्नांविषयी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी सायंकाळी बैठक झाली. त्या वेळी महापौर दत्तात्रय धनकवडे, उपमहापौर आबा बागुल, सभागृहनेते बंडू केमसे, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, भाजपाचे गटनेते गणेश बिडकर, आयुक्त कुणाल कुमार, सहआयुक्त सुरेश जगताप आदी उपस्थित होते. त्या वेळी शहरातील कचरा प्रक्रिया, बायोगॅस व गांडूळ खत प्रकल्पात निचरा होणारा कचरा व शिल्लक कचऱ्याचा आढावा घेण्यात आला. शहरात रोज निर्माण होणाऱ्या ओला व सुका कचऱ्याची प्रत्येक प्रभागानुसार वस्तुनिष्ठ माहिती अधिकाऱ्यांना सांगता आली नाही. त्यामुळे महापालिकेतील गटनेत्यांनीही कचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांच्या कार्यवाहीबाबत शंका उपस्थित केली. तसेच, केवळ ‘स्वच्छ’ या एका संस्थेवर अवलंबून राहून चालणार नाही. कोणत्याही एक संस्थेची व कंपनीची मक्तेदारी निर्माण झाली की, कचरा प्रश्न सोडविणे अडचणीचे ठरत असल्याचे महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी मांडले. त्यावर बापट म्हणाले, ‘‘कचऱ्याचा प्रश्न सोडविण्याची प्रमुख जबाबदारी महापालिकेची आहे. याविषयी मला कोणी विचारणार नाही. तरीही पालकमंत्री म्हणून मी स्वत: कचऱ्याचा प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे महापालिकेतील सत्ताधारी आघाडीचे नगरसेवक, सर्व आमदार व खासदार यांनीही कचरा प्रकल्प उभारण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.’’