शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

बिघाडामुळे विमानाचे उड्डाण रद्द

By admin | Updated: October 18, 2014 01:47 IST

गुरुवारी रात्री पुण्याहून दिल्लीला जाणारे विमान इंजिनामध्ये झालेल्या बिघाडामुळे शुक्रवारीही उड्डाण करू शकले नाही. त्यामुळे प्रवाशांनी विमानतळावर प्रचंड गोंधळ घातला.

पुणो : गुरुवारी रात्री पुण्याहून दिल्लीला जाणारे विमान इंजिनामध्ये झालेल्या बिघाडामुळे शुक्रवारीही उड्डाण करू शकले नाही. त्यामुळे प्रवाशांनी विमानतळावर प्रचंड गोंधळ घातला. परंतु याची साधी दखलही विमानतळ अधिका:यांनी घेतली नाही.
एअर इंडियाचे फ्लाय एआय 854 हे विमान गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास दिल्लीसाठी उड्डाण करणार होते. त्याचवेळी अधिका:यांनी प्रवाशांना विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती दिली. गुरुवारी रात्री बारार्पयत हे विमान दुरुस्त होईल असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु शुक्रवारी रात्री उशिरार्पयत दुरुस्ती झालेली नव्हती अशी माहिती प्रवाशांनी दिली. 
प्रवासी असलेले एमपी ग्रुपचे संचालक आनंद रेगी यांनी  ‘लोकमत’ दिलेल्या माहितीनुसार, विमानाच्या इंजिनामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगण्यात आले होते. रात्री बारा वाजता आणखी वेळ लागणार असल्याचे सांगण्यात आले. रात्री साडेतीन वाजेर्पयत बसवून ठेवल्यानंतर शुक्रवारी दुपारी बारा वाजता विमान उड्डाण करेल असे सांगून घरी जाण्यास सांगण्यात आले.
शुक्रवारी दुपारी सर्व प्रवासी पुन्हा विमानतळावर गेले तेव्हा त्यांना विमानात बसण्यासाठी सांगण्यात आले. बराच वेळ विमानात बसल्यानंतर दीडच्या सुमारास विमानाने धावपट्टीवर धावण्यास सुरुवात केलीच होती की पुन्हा इंजिनामधून आवाज आला. प्रवाशांच्या हाती शेवटी निराशाच पडल्याचे जितेंद्र कुमार यांनी सांगितले. इंजिनामधून जोरात आवाज आल्यामुळे सगळे प्रवासी घाबरले. त्यानंतर पुन्हा सर्वाना खाली उतरवण्यात आले. यासोबतच दिल्लीवरुन दुसरे विमान मागवण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. परंतु ते विमानही अद्याप पुण्यात पोचलेले नाही. (प्रतिनिधी) 
 
च्पुणो विमानतळाचे संचालक मनोज गांगल यांनी  ‘लोकमत’ जवळ खेद व्यक्त केला. प्रवाशांना त्रस झाला त्याबद्दल आपल्याला खेद असून याबाबत एअर इंडियाच्या क्षेत्रिय संचालकांना माहिती दिली आहे. त्यांनी ठोस पावले उचलण्याचे आश्वासन दिल्याचे गांगल यांनी सांगितले.