शहरं
Join us  
Trending Stories
1
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
4
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
5
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
6
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
7
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
8
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
9
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
10
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
11
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
12
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
13
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
14
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
15
‘अटक ते कटक’ नकाशावरून महाराष्ट्रात संताप का?; मराठा साम्राज्याचा नकाशाच केला गायब
16
देशाबाहेर जाणारा पैसा अडविण्याची हिंमत हवी! हा भारताच्या स्वयंनिर्भरतेच्या आत्म्यावरच आघात
17
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
18
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
19
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
20
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
Daily Top 2Weekly Top 5

फ्लॅटच्या आमिषाने एक कोटीचा गंडा

By admin | Updated: April 4, 2015 06:04 IST

अल्पदरामध्ये सदनिका देण्याची आॅनलाईन जाहिरात करून २३ जणांची तब्बल १ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आ

येरवडा : अल्पदरामध्ये सदनिका देण्याची आॅनलाईन जाहिरात करून २३ जणांची तब्बल १ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी ३ जणांना अटक केली असून, त्यांचे दोन साथीदार फरार झाले आहेत.अंकुश बबन वडे (वय २९, रा. टेंभी, आग्रीवाडी, जि. पालघर, मूळ रा. बोईसर वेस्ट, मुंबई, सध्या रा. चाकण), योगेश रघुनाथ कारंडे ऊर्फ युवराज राजाराम गडकरी ऊर्फ युसुफ मकलाई ऊर्फ नंदकुमार कुंबळे ऊर्फ राज चव्हाण (वय ३१, रा. अ‍ॅमेनोरा टाऊन सेंटर, हडपसर, पुणे, मूळ रा. पाटण, जि.सातारा) व आकाश ऊर्फ विक्रांत उमेश पाटील (वय २२, रा. महाराष्ट्र हौसिंंग सोसायटी, येरवडा, पुणे) यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी नंदिनी रमेशकुमार ठाकूर गौतम (वय ३०, रा. एफ ४/१००८, आयव्ही वाईल अपार्टमेंट, वाघोली) यांनी फिर्याद दिली आहे. नंदिनी या खराडीतील झेन्सार कंपनीत ज्येष्ठ संगणक अभियंता आहेत. या तिघांना ७ एप्रिलपर्यंत ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर स्वरूप शर्मा ऊर्फ राज शुक्ला ऊर्फ सूरज राकेश चोबे व रोहन पाटील हे दोघे जण अद्याप फरारी आहेत. आरोपींनी विमाननगरमधील लुंकड स्कायमॅक्स इमारतीमध्ये तसेच लष्कर परिसरातील क्लोअर सेंटरमध्येही दुकान भाड्याने घेतले होते. आॅलमॅक्स रियालिटी एकर्स व वेलिंग्टन होम झोन इंडिया प्रा.लि. या कंपन्यांच्या नावाने स्वस्तामध्ये सदनिका देण्याच्या जाहिराती केल्या होत्या. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नंदिनी आणि अन्य गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी तपास करून तिघांना अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय कुरुंदकर, विठ्ठल देवकर, प्रताप कोलते, राजेंद्र वाघ, चंद्रकांत जाधव, नवनाथ वाळके आदींनी तपास केला.