पाच तोळे सोने आणले नाही; विवाहितेच्या अंगाला चटके, नवऱ्याकडून मारहाण, दिराकडून विनयभंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 11:00 IST2023-10-20T10:59:44+5:302023-10-20T11:00:35+5:30

महिलेचे लग्न झाल्यापासूनच सासरच्यांकडून छळ सुरू होता

Five talents of gold were not brought Hits on the body of the married woman beaten by the husband molested by the wife | पाच तोळे सोने आणले नाही; विवाहितेच्या अंगाला चटके, नवऱ्याकडून मारहाण, दिराकडून विनयभंग

पाच तोळे सोने आणले नाही; विवाहितेच्या अंगाला चटके, नवऱ्याकडून मारहाण, दिराकडून विनयभंग

लोहगाव : सासरच्यांकडून विवाहितेचा छळ करून माहेराहून पाच तोळे व ५० हजार आणले नाहीत म्हणून अंगाला चटके देऊन सासू,सासरे, नवऱ्याकडून मारहाण करण्याचा प्रकार इंदिरानगर लोहगाव येथे घडला. या प्रकरणात दिराकडून विनयभंग करण्यात आल्याने फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पती रवि बालाजी धोत्रे (२६ ), सासरे बालाजी शेटीबा धोत्रे (५६), सासू सुंदरा बालाजी धोत्रे (५१), दीर बालाजी धोत्रे (२४) ही आरोपींची नावे असून सर्व बर्माशेल इंदिरानगर साईबाबा मंदिर लोहगाव येथे राहतात. त्या महिलेचे लग्न झाल्यापासूनच सासरच्यांकडून छळ सुरू होता. तसेच दिराने घरात येऊन त्या महिलेच्या गळ्याला चाकू लावून विनयभंग केला व याविषयी कोणाला सांगितले तर जीवे मारण्याची धमकीसुद्धा दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी सर्व आरोपी फरार असून पोलिसांची शोधमोहीम सुरू आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संदीप कपरे करत आहेत. दोषींना तत्काळ अटक करावी, अन्यथा जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्तालयासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.

Web Title: Five talents of gold were not brought Hits on the body of the married woman beaten by the husband molested by the wife