शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

पंचतारांकित सर्किट हाऊस धूळखात

By admin | Updated: August 13, 2015 04:47 IST

राज्यात प्रथमच सरकारी इमारतीला पंचतारांकित इमारताची दर्जा मिळालेल्या पुण्याच्या नवीन सर्किट हाऊसचा देखभाल दुरुस्तीचा मोठा प्रश्न बांधकाम विभागासमोर आहे. मुंबईतील ‘सह्याद्री’भवन

पुणे : राज्यात प्रथमच सरकारी इमारतीला पंचतारांकित इमारताची दर्जा मिळालेल्या पुण्याच्या नवीन सर्किट हाऊसचा देखभाल दुरुस्तीचा मोठा प्रश्न बांधकाम विभागासमोर आहे. मुंबईतील ‘सह्याद्री’भवन प्रमाणे आऊटसोर्सिंग करून हे पंचतारांकित सर्किट हाऊस चालविण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने शासनाला पाठवला आहे. परंतु, या प्रस्तावाला अद्याप मान्यता न मिळाल्याने गेल्या वर्षभरापासून कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेले पंचतारांकित व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस वापराविना धूळखात पडून आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने बंडगार्डन येथे बीओटी तत्त्वावर हे आलिशान सर्किट हाऊस बांधण्यात आले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या आलिशान सुटसह सुमारे ३५ खोल्या, इमारतीवर हेलिपॅड, तीन सभागृहे, मिटींग हॉल आणि पार्किंगची सुसज्ज व्यवस्था येथे उपलब्ध आहे. सर्व सोयीसुविधांनी सज्ज असलेल्या या सर्किट हाऊसचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक वर्षापूर्वीच उद्घाटन केले आहे.सध्या पुण्यात इन्स्पेक्शन बंगलो, इतर अभ्यागत, आमदार, खासदार यांच्यासाठी नवीन सर्किट हाऊसमधील आठ सूट आहेत. तर व्हीव्हीआयपी सर्किट हाऊसमध्ये कॅबिनेट दर्जाच्या अधिकाऱ्यांसाठी सर्व सूट राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे या पंचतारांकित सर्किट हाऊसमध्ये नक्की कोणाला येथे जागा द्यावी, हा मोठा प्रश्न आहे. तसेच सर्किट हाऊसवर असलेल्या हेलिपॅडला कँन्टोन्मेंट बोर्डांची परवानगी मिळाली असून, सदर्न कमांडने मात्र हेलिपॅड वापरावर निर्बंध घातले आहेत. सदर्न कमांडचे मुख्यालय येथे असून, त्याच्या सुरक्षितेच्या दृष्टीने केवळ सरकारी हेलिकॉप्टरलाच हेलिपॅडवर उतरण्याची परवानगी द्यावी, असे सदर्न कमांडचे म्हणणे आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविण्यात आला आहे. (प्रतिनिधी)सर्किट हाऊसची देखभाल करण्यासाठी दररोज किमान १० ते १५ कर्मचाऱ्यांची २४ तास नियुक्ती करावी लागणार आहे. हा खर्च मोठा असून, इतके कर्मचारी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे नाहीत. त्यामुळे यासाठी आऊटसोर्सिंग करावे तसेच या सर्किट हाऊसमध्ये कोणाला निवासासाठी जागा द्यावी, याबाबत देखील मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. परंतु, गेल्या सहा महिन्यांपासून शासनाकडून याबाबत कोणतेही आदेश झालेले नाहीत.