शहरं
Join us  
Trending Stories
1
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
2
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार? संजय राऊतांचा ठाण्यातून हल्लाबोल
3
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
4
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
5
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
6
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
7
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
8
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
9
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
10
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
11
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
12
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
13
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
14
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
15
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
16
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
17
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
18
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
19
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला

मालकाशी झालेल्या वादातून केली चोरी : पाच जणांना पुण्यात अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2019 5:07 PM

बुधवार पेठेत असणा-या एका इलेक्ट्रॉनिक सामानाच्या गोडाऊनमधून 24  लाख 60 हजार किंमतीचे इलेक्ट्रीक सामानाचे बॉक्स चोरणा-या पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली.

पुणे : बुधवार पेठेत असणा-या एका इलेक्ट्रॉनिक सामानाच्या गोडाऊनमधून 24  लाख 60 हजार किंमतीचे इलेक्ट्रीक सामानाचे बॉक्स चोरणा-या पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली. युनिट 1 च्या पथकाने ही कारवाई केली. या गुन्हयातून एकूण 30 लाख 60 हजार 878 चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.  याबाबत फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.अक्षयकुमार श्रीमेवालाल सरोज(20), विनयकुमार विरेंद्रनारायण सरोज(20), राहुल रामसजीवन सरोज(20), निरजकुमार मेघाई सरोज(19), सुनिलकुमार शामसुंदर सरोज(24), अरविंदकुमार प्यारेलाल सरोज(20, सर्व रा. उत्तरप्रदेश) अशी अटक आरोपींची नावे आहे. याप्रकरणी दिपक रमेश वाधवानी(रा.साधु वासवानी चौक) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादी यांचे बुधवार पेठेत इलेक्ट्रीक सामानाचे गोडावून आहे.  हे गोडाऊन बंद असताना  6 ते 8 जुलै रोजी त्यांच्या गोडाऊनच्या खिडकीची फ्रेम तोडून गोडाऊनमधील 24 लाख 60 रुपयांचे इलेक्ट्रीकल सामानाचे बॉक्स चोरले. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्हयाचा तपास गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाकडूनही सुरु होता. दरम्यान तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक दिनेश पाटील व पोलीस हवालदार योगेश जगताप, सुधाकर माने यांना आरोपींनी गुन्हा करताना वापरलेला टेम्पो सापडला. त्याच्या चालकाकडे तपास केला असता, त्याने टेम्पोचा वापर त्याच्या उत्तरप्रदेशातील गावाकडील साथीदारांना गुन्ह्यासाठी केला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार आरोपींना त्याच्या राहत्या घरातून मंगळवार पेठ व पाटील इस्टेट झोपडपट्टीतून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून चोरीला गेलेला सर्व माल आणि टेम्पो हस्तगत करण्यात आला.  विनयकुमार फियार्दीच्या गोडाऊनमध्ये वर्षभरापुर्वी कामाला होता. त्यामुळे त्याला गोडाऊनची माहिती होती. कामाच्या ठिकाणी झालेल्या वादाचा राग मनात धरुन त्याने चोरीचा कट रचला. चोरी करण्याकरिता वापरलेल्या टेम्पोचा रंग आणी नंबरप्लेट आरोपींनी बदलली होती. यामुळे सीसीटीव्ही फुटेजमध्ये टेम्पो दिसूनही पोलिसांना माग काढता आला नाही. मात्र चोरीझाल्यावर पुन्हा मुळे टेम्पोचाच नंबर टेम्पोवर टाकण्यात आला. टेम्पोचा कलर मात्र तोच होता.      ही कारवाई अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण वायकर, पोलीस उपनिरीक्षक दिनेश पाटील, उत्तम बुदगुडे, हनुमंत माने, पोलीस कर्मचारी सुधाकर माने, रिजवान जिनेडी, श्रीकांत वाघवले, तुषार खडके, इरफान मोमिन, प्रशांत गायकवाड, योगेश जगताप, तुषार माळवदकर, हनिफ शेख, बाबा चव्हाण, अनिल घाडगे, संजय बरकडे, वैभव स्वामी, अशोक माने, सुभाष पिंगळे, अमोल पवार, प्रकाश लोखंडे, सचिन जाधव, अजय थोरात, इमरान शेख यांच्या पथकाने केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरीArrestअटक