मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 13:10 IST2019-01-04T12:33:31+5:302019-01-04T13:10:15+5:30
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा बोर घाटातील आडोशी बोगद्याजवळ झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
लोणावळा - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा बोर घाटातील आडोशी बोगद्याजवळ झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. शुक्रवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास किमी 41 जवळ हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईच्या दिशेने सिमेंट बॅगा घेऊन जाणारा ट्रक हा आडोशी बोगदा पार करुन जात होता. त्याचदरम्यान समोरील वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक मुंबई लेनवरुन पुणा लेनवर पलटी झाला. यावेळी पुण्याच्या दिशेने जाणार्या तीन कार या ट्रकखाली चिरडल्याने त्यामधील चार जणांचा जागीच तर एक जणाचा उपचाराकरिता घेऊन जात असताना मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन महिला व दोन पुरुषांचा समावेश असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
#Maharashtra: 4 people killed, 5 injured in collision between a truck and a car near Khopoli on Pune-Mumbai expressway. pic.twitter.com/IwDwWL0qsK
— ANI (@ANI) January 4, 2019
अपघातानंतर ट्रकमधील सिमेंट रस्त्यावर सर्वत्र पसरल्याने पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प झाली असून लांबच लांब वाहनांचा रांगा लागल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच खोपोली व बोरघाट पोलीस, अपघातग्रस्तांच्या मदतीला या सामजिक संस्थेचे कार्यकर्ते, आयआरबी व डेल्टा फोर्सचे कर्मचारी व देवदूत पथकाने घटनास्थळाकडे धाव घेत मृत व जखमींना वाहनांमधून बाहेर काढत उपचाराकरिता रवाना केले. अपघातग्रस्त वाहने व रस्त्यावर पसरलेले सिमेंट बाजुला करण्याचे काम सुरू आहे.