पुण्यातील चाेरांना फाॅर्च्युनरची क्रेझ ; आठवड्यात पाच गाड्या चाेरीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 18:33 IST2019-05-02T18:23:37+5:302019-05-02T18:33:46+5:30

गेल्या आठवड्याभरात पुण्यातून पाच फाॅर्च्युनर कार चाेरीला गेल्याचे समाेर आले आहे.

five fortuner cars were stolen in a week | पुण्यातील चाेरांना फाॅर्च्युनरची क्रेझ ; आठवड्यात पाच गाड्या चाेरीला

पुण्यातील चाेरांना फाॅर्च्युनरची क्रेझ ; आठवड्यात पाच गाड्या चाेरीला

पुणे : गेल्या आठवड्याभरात पुण्यातून पाच फाॅर्च्युनर कार चाेरीला गेल्याचे समाेर आले आहे.  विशेष म्हणजे या पाच गाड्यांपैकी 3 गाड्या या नगरसेवकांच्या आहेत. मंगळवारी रात्री अज्ञात चाेरट्यांनी नगरसेवक रवींद्र धंगेकर यांची फाॅर्च्युनर गाडी अवघ्या 17 मिनिटांमध्ये चाेरुन नेली. हा सर्व प्रकार सीसीटिव्ही मध्ये कैद झाला आहे. 

मागील काही दिवसांपासून शहरात चाेरटे फाॅर्च्युनर गाड्या लक्ष करुन रात्रीच्या वेळी त्या चाेरुन नेत आहेत. या आधी नगरसेवक दीपक पाेटे, नगरसेविका स्मीता वस्ते यांची फाॅर्च्युनर कार चाेरट्यांनी चाेरुन नेली हाेती. मंगळवारी रात्री नगरसेवक रवींद्र धंगेकर यांची फाॅर्च्युनर कार देखील चाेरट्यांनी चाेरली. विशेष म्हणजे चाेरट्यांनी कसबा पेठेतून राजवर्धन शिताेळे यांची फाॅर्च्युनर आधी चाेरली. त्यानंतर त्याच कारने धंगेकर यांच्या घराजवळ येऊन बाहेर असलेली त्यांची कार चाेरली. हा सर्व प्रकार सीसीटिव्हीमध्ये कैद झाला आहे. चाेरटे केवळ फाॅर्च्युनर कारच चाेरत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

दरम्यान उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल या भागांमध्ये येत्या काळात मतदान हाेणार असल्याने उमेदवारांच्या प्रचारासाठी या गाड्या महाराष्ट्रातून चाेरुन नेल्या जात असल्याचा अंदाज पाेलिसांनी व्यक्त केला आहे. 

Web Title: five fortuner cars were stolen in a week