किरण शिंदे
पुणे: पुण्यात १५ वर्षीय तरुणाला घरातूनच चोरी करायला लावून लाखो रुपयांचे दागिने आणायला सांगितले. न आणल्यास मुलाला आणि कुटुंबीयाला ठार मारण्याची धमकी देणाऱ्या तीन जणांविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून 14 लाख रुपयांचे दागिने पोलिसांनी केले जप्त केले आहेत. रेहान शब्बीर कुरेशी (वय २६), स्टिफन जॉन शिरसाठ (वय २०), रोहीत नवनाथ ओव्हाळ असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत
मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलाची आणि तिन्ही आरोपींची एका मित्रासोबत ओळख झाली. वयाने मोठ्या असलेल्या या तीन तरुणांनी त्याच्याशी जवळीक साधून त्याच्याशी मैत्री केली. वेळोवेळी अल्पवयीन तरुण हा या तीन जणांना भेटायला जात असे. ते तिन्ही जणं त्याच्याशी गोड बोलून त्याला गाडी देखील चालवायला शिकवत असे. व्यापाराचा मुलगा असल्यामुळे आरोपींनी त्याचा फायदा घ्यायला सुरुवात केली. फिरायला जाण्यासाठी किंवा इतर मौज मजेसाठी आरोपी बऱ्याचदा त्या तरुणाला घरून पैसे आणायला लावत होते. जेव्हा पैसे नसतील तेव्हा आरोपींनी अल्पवयीन तरुणाला घरातून सोनं आणायला सांगितलं. मैत्रीच्या दुनियेत बुडालेल्या त्या तरुणाने सुरवातील अनेक वेळा ते तिघे जसे म्हणतील तसं ऐकलं. मात्र एकेदिवशी यापेक्षा जास्त पैसे आणि सोनं नाही आणू शकत म्हणाल्यावर आरोपींनी तुला आणि तुझ्या कुटुंबियाला ठार मारून टाकू अशी धमकी द्यायला सुरुवात केली.
दरम्यान, आपल्या घरातून सोनं गायब होत असल्याची चाहूल अल्पवयीन तरुणाच्या आजोबांना लागली. कुटुंबियातील लोकांनी अल्पवयीन तरुणाला याबाबत विचारले असता त्याने हे सगळं त्या तिघांच्या सांगण्यामुळे केलं अशी कबुली दिली. या नंतर कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास करत असताना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ४ चे कर्मचाऱ्यांना ते तिघे ही तरुण चोरलेले सोने विकायला जाणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून या तिघांना ताब्यात घेतले आणि त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून ३३०.९६० ग्रॅम (३३ तोळे ६९० मि.ग्रॅम) वजनाचे सोन्याचे दागिणे व त्याचे ताब्यातील गाडीचे डीक्की मध्ये ०४ लाख रोख रक्कम असे गाडीसह एकुण १४ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.