शिरोलीत तरुणीवर गोळीबार

By Admin | Updated: June 16, 2017 04:40 IST2017-06-16T04:40:53+5:302017-06-16T04:40:53+5:30

शिरोली येथे प्रेमप्रकरणातून तरुणीवर गोळीबार करण्यात आला. यात तरुणी गंभीर जखमी झाली आहे. काजल लक्ष्मण शिंदे असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीचे नाव

Firing on the girl in Shiroli | शिरोलीत तरुणीवर गोळीबार

शिरोलीत तरुणीवर गोळीबार

लोकमत न्यूज नेटवर्क
राजगुरुनगर : शिरोली येथे प्रेमप्रकरणातून तरुणीवर गोळीबार करण्यात आला. यात तरुणी गंभीर जखमी झाली आहे. काजल लक्ष्मण शिंदे असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी आरोपी कृष्णा राजपूत ऊर्फ विजयकुमार जठार यांला पोलिसांना ताब्यात घेतले आहे.
शिरोली येथे एका तरुणीवर गोळीबार एका तरुणाने गोळीबार केला आहे. काजल शिंदे (वय १७, रा. शिरोली. ता. खेड) असे तरुणीचे नाव आहे, तर गोळीबार करणाऱ्या मुलाचे नाव विजयकुमार जठार ऊर्फ कृष्णा राजपूत (वय २५, रा. चाकण) असे आहे. प्रेमप्रकरणातून हा हल्ला झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
आज सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. आज सकाळी काजल ही दूध आणि साखर घरी घेऊन जात होती. या वेळी काजलला प्रियकर कृष्णा हा हाका मारीत तिच्या पाठीमागे येत होता. त्याने तोंडाला रुमाल बांधला होता. दरम्यान कृष्णाने तिचा उजवा हात पकडून छातीवर पिस्तुल ठेवून ‘माझ्याबरोबर चल’ असे सांगितले. काजलने त्याला नकार देताच तिच्या छातीवर गोळी झाडली. ही गोळी छातीत गेल्यामुळे काजल जागीच कोसळली. दरम्यान काजलने आरोडाआरोडा केल्यानंतर तिचे दोघे भाऊ पळत आले.
हल्लेखोर कुष्णा रजपूत याने तिथून पळ काढला. गोळीबारात काजल ही गंभीर जखमी झाली असल्याने तिला तत्काळ खेड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. कृष्णा रजपूत पळून जात होता मात्र पोलिसांनी त्याला पकडले.

Web Title: Firing on the girl in Shiroli