शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

जमीन खरेदी - विक्री करणार्‍यावर पुण्यातील चांदणी चौकाजवळ गोळीबार; थोडक्यात वाचला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2021 3:13 PM

वारजे भागात बांधकाम ठेकेदारावर गोळीबार, सतर्कतेमुळे वाचला जीव, हल्ल्याची दृश्ये सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद

पुणे : वारजे भागातील डुक्कर खिंड परिसरात मोटारसायकलवरुन आलेल्या चौघांनी बांधकाम ठेकेकदारावर पिस्तुलातून गोळीबार केल्याची घटना शनिवारी घडली.  ठेकेदार वेळीच सावध झाल्याने ते पळाल्याने या हल्ल्यातून बचावले. हल्लेखोरांनी सुरुवातीला अगदी जवळून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. आर्थिक वाद किंवा पूर्ववैमनस्तयातून हा गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

रवींद्र सखाराम तागुंदे (वय ३६, रा. वारजे) असे या बांधकाम ठेकेदाराचे नाव आहे. तागुंदे यांचे वारजे परिसरातील मुंबई -बंगळुरु बाह्यवळण रस्त्यावरील सर्व्हिस रोडला वंडर फ्युचरा इमारतीत कार्यालय आहे. त्यांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. तागुंदे हे शनिवारी सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास कार्यालयासमोर आले. रस्त्याच्या कडेला कारमधील व्यक्तीशी ते बोलत होते. त्याचवेळी पाठीमागून एका मोटारसायकलवरुन दोघे जण आले. ते रस्त्याने सरळ जाण्याऐवजी रस्त्यांच्या कडेला जागा नसतानाही त्यांनी त्यांच्या बाजूला मोटारसायकल घातल्याने तागुंदे यांचे त्यांच्याकडे लक्ष गेले. तेव्हा पाठीमागे बसलेल्याच्या हातातील पिस्तुल पाहून ते पटकन खाली वाकले. तेव्हा हल्लेखोरांनी अगदी जवळून एका पाठोपाठ २ गोळ्या झाडल्या. पण तागुंदे वाकल्यामुळे त्यांचा नेम चुकला. ही संधी साधून तागुंदे पटकन मागच्या बाजूला पळाले. त्यानंतरही हल्लेखोराने आणखी दोन गोळ्या त्यांच्या दिशेने झाडल्या. या हल्लेखोरांच्या पाठोपाठ आणखी दोघे जण मोटारसायकलवरुन तेथे आले. सुदैवाने तांगुदे हे पळाल्याने बचावले. आपला हल्ला वाया गेल्याचे लक्षात आल्यावर हल्लेखोर परत उलट्या दिशेने पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी, वारजे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. 

तागुंदे यांच्या कार्यालयाजवळ असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात या हल्ल्याची दृश्ये कैद झाली आहेत, मात्र,  ती बर्‍याच लांबवरुन टिपली गेली आहेत. हल्लेखोरांचा माग करण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

तागुंदे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. यापूर्वी त्यांची दोन खुन प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाली आहे. पूर्ववैमनस्य किंवा आर्थिक वादातून हा हल्ला झाला असल्याची शक्यता असून त्यादृष्टीने तपास करण्यात येत असल्याचे पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेFiringगोळीबारPoliceपोलिसkothrudकोथरूडCrime Newsगुन्हेगारी