शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदारीवरून गोळीबार

By admin | Updated: June 22, 2016 00:56 IST

औद्योगिक क्षेत्रातील ठेकेदारीतील वाद सोमवारी रात्री पुन्हा समोर आला. येथील मृत्युंजय ग्रुपचा सदस्य व कारखान्यात ठेकेदार असलेल्या पिंटू ऊर्फ संतोष रभाजी दरेकर याच्यावर कारखान्यातील भंगार

कोरेगाव भीमा : सणसवाडी (ता. शिरूर) येथील औद्योगिक क्षेत्रातील ठेकेदारीतील वाद सोमवारी रात्री पुन्हा समोर आला. येथील मृत्युंजय ग्रुपचा सदस्य व कारखान्यात ठेकेदार असलेल्या पिंटू ऊर्फ संतोष रभाजी दरेकर याच्यावर कारखान्यातील भंगार मालाच्या ठेक्यावरून सणसवाडीचे उपसरपंच युवराज दरेकर व राजेंद्र दरेकर यांनी अनोळखी तीन इसमांशी संगनमत करून त्यांच्याकरवी गोळीबार केला. यात पिंटू दरेकर याच्या मानेला गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. १४ एप्रिल रोजी युवराज दरेकर याच्यावर झालेल्या हल्ल्यातूनच सदर गुन्हा घडला असण्याची शक्यता पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी युवराज दरेकर व राजेंद्र दरेकर यांना ताब्यात घेण्यात आले आहे.शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व सागर सुनील वरपे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, सणसवाडी औद्योगिक क्षेत्रात मोठ्याप्रमाणावर औद्योगिक कारखाने आहेत. कारखान्यांमध्ये काम मिळविण्यात येथे मोठी स्पर्धा सुरू आहे. बहुतांश कारखान्यांत सणसवाडीचे उपसरपंच युवराज दरेकर यांचे ठेके आहेत. एक-दीड वर्षांपासून पिंटु ऊर्फ संतोष रभाजी दरेकर यानेहीे अनेक कारखान्यांत ठेके घेतले. हे ठेके घेत असताना त्याचे युवराज दरेकर व राजेंद्र दरेकर यांच्याशी वाद होऊ लागले. याच दरम्यान एक महिन्यापूर्वी पिंटू याच्या घरासमोर ४ ते ५ अनोळखी मुलांनी गोंधळ घातला होता. गोंधळ घालणारे तरुण युवराज दरेकर व राजेंद्र दरेकर यांच्याबरोबर फिरताना दिसले होते.दरम्यान, सोमवारी (२० जून) रात्री पिंटू दरेकर, विक्रम दरेकर, सोमनाथ हरगुडे व फिर्यादी सागर वरपे सणसवाडीतील एका बँकेसमोर गप्पा मारत बसले होते. सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास दोन अनोळखी इसम जवळ आले. त्यापैकी एकाने पिंटू दरेकर याच्यावर मागून पिस्तुलाने गोळीबार केला. पिंटू खाली बसल्याने सदर गोळी त्याच्या मानेला लागली.गोळीबार केल्यानंतर, ते दोघे चेअरमनवस्तीकडे पळून गेले. त्यांचा पाठलाग फिर्यादी व इतरांनी केला; मात्र काही अंतरावर त्यांचा अजून एक साथीदार दुचाकीवर पळून जाताना पाहिले. त्यानंतर पिंटू दरेकर याला वाहनातून पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. घटनास्थळी नंबरमध्ये खाडोखोड असलेली एक दुचाकी सापडली आहे. ती आरोपींचीच असण्याची शक्यता आहे. दरम्यान, घटनास्थळी दंगल नियंत्रक पथक सोमवारी रात्रीपासून तैनात करण्यात आले असून, ठसेतज्ज्ञ, डॉगस्कॉड पथकही आले होते. घटनास्थळी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, दौंड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मोरे यांनी भेट दिली. या घटनेत युवराज दरेकर व राजेंद्र दरेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. इतर तीन अनोळखी इसमांचा पोलीस शोध घेत आहेत. पुढील तपास शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ हे करीत आहेत. पोलीस उपनिरीक्षक चेतन थोरबोले, सहायक फौजदार जयप्रकाश चव्हाण, दत्तात्रय शिंदे, विलास आंबेकर, ब्रह्मा पोवार, विजय गाले, अमित देशमुख, अनिल जगताप, पोपट गायकवाड, संदीप जगदाळे आदी आरोपींचा शोध घेत आहेत. (वार्ताहर)वादास कारखानदार जबाबदार ?कारखानदारीमध्ये ठेका मिळवण्याच्या स्पर्धेतूनच सणसवाडी औद्योगिक परिसरात हल्ले वाढू लागले आहेत. यास कारखानदार व कामगार आयुक्तही जबाबदार आहेत. कारखानदारांनी कारखान्यात काम देताना एकाएका ठेकेदाराला काम न देता सर्वांना वाटुन काम दिले तर वाद होणार नाहीत. मात्र कारखानदार जाणीवपूर्वक वादास खतपाणी घालताना गावातील तरुणांमध्ये वाद लावत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.