शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
4
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
5
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
6
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
7
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
8
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
9
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
10
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
11
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
12
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
13
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
14
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
15
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

सिगारेट दिली नाही म्हणून पेट्रोल टाकून घरच पेटवलं; वानवडीत 'मोठा पणती' टोळक्याचा धुडगूस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 4:11 PM

पेट्रोलपंपावरील कर्मचार्‍याला मारहाण करुन मॅनेजरच्या केबीनमध्ये घुसून तोडफोड केली.

पुणे : शहरातील हांडेवाडी रोडवरील सय्यदनगर, चिंतामणीनगर परिसरात मोठा पणती टोळक्याने धुडघूस घालत पानटपरी चालकाचा गळा दाबला. पेट्रोल टाकून घर पेटवून खुनाचा प्रयत्न केला. त्यानंतर या टोळक्याने दोन दुकानावर दरोडा टाकत गल्ल्यातील रोकड जबरदस्तीने चोरली. पेट्रोलपंपावरील कर्मचार्‍याला मारहाण करुन मॅनेजरच्या केबीनमध्ये घुसून तोडफोड केली.

याप्रकरणी वानवडीपोलिसांनी नोमन सय्यद व मोठा पणती ऊर्फ रिझवान शेख (रा. चिंतामणीनगर, हडपसर) या दोघांना अटक केली आहे. या घटना सोमवारी सकाळी सात ते रात्री एक वाजण्याच्या दरम्यान घडल्या आहेत. नोमन सय्यद, मोठा पणती, आत्तु अन्सारी या तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न, जबरदी चोरी, दरोडा, दहशत निर्माण करणे असे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याप्रकरणी आरिफ रफिक सय्यद (वय ३३, रा. चिंतामणीनगर, हांडेवाडी रोड) यांनी फिर्याद दिली आहे. नोमन व आत्तु या दोघांनी आरिफ यांच्या वडिलांच्या पान टपरीच्या लोखंडी बॉक्सवर दगड मारुन शिवीगाळ केली. त्यांना सिगारेट मागितली परंतु, लॉकडाऊनमुळे टपरी बंद असल्यामुळे सिगारेट नसल्याचे वडिलांनी सांगितले. त्यावर  या दोघांनी त्यांच्या वडिलांना साले बुढे हमको सिगारेट नही देता, असे म्हणून खाली पाडून त्यांचा गळा दाबला. त्यामध्ये ते बेशुद्ध पडले. आरिफ यांनी त्यांना उपचारसाठी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान आरिफ यांनी वडिलांवर उपचार करुन त्यांना घरी घेऊन आले. ते घराबाहेर थांबले असताना हे दोघे परत तेथे आले. त्यांनी जीवे ठार मारण्याची धमकी देऊन आम्ही इथले भाई असून दररोज फुकट सिगारेट देण्यास सांगितले.  त्यानंतर आरोपींनी कमरेला लावलेला कोयता हवेत फिरवून दहशत निर्माण केली. आरिफ हे हॉस्पिटलमध्ये असताना त्यांच्यावर दहशत रहावी, म्हणून घरात इतर लोक असताना व त्यांचा जीव जाईल हे माहिती असताना पेट्रोल टाकून घर पेटवून दिले.

दुसर्‍या घटनेत सागर राजकुमार राठोड (वय २०, रा. सय्यदनगर, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. चिंतामणी अमृततुल्य या चहा दुकानात ते सकाळी ७ वाजता काम करीत होते. त्यावेळी नोमन, मोठा पणती व आत्तु हे तिघे तेथे विनामास्क आले. त्यांनी कोयत्याचा धाक दाखवून गल्ल्यातील ८०० रुपये जबरदस्तीने चोरुन नेले. तेथील मगर पेट्रोल पंपावरील कर्मचार्‍यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. पंपावरील मॅनेजरच्या रुममध्ये शिरुन तोडफोड करुन मॅनेजर बाळू अंभोरे यांना मारहाण केली.

तिसर्‍या घटनेबाबत केवळराम लादुराम परमार (वय ४१, रा. चिंतामणी नगर) यांनी फिर्याद दिली आहे. ते सकाळी साडेसातच्या सुमारास नवदुर्गा किराणा मालाच्या दुकानात काम करत होते. त्यावेळी हे तिघे जण आले. त्यांनी परमार यांना उलट्या कोयत्याने मारहाण केली. काऊंटरवरील साहित्य रस्त्यावर पाडून नुकसान केले. गल्ल्यातील ३ हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने चोरुन नेली. या प्रकरणात पोलिसांनी तीन गुन्हे दाखल करुन दोघांना अटक केली आहे.

टॅग्स :WanvadiवानवडीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीSmokingधूम्रपानPetrol Pumpपेट्रोल पंप