पुण्यातील कॅम्पमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग; एक कपड्याचे दुकान जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 18:06 IST2021-07-20T18:06:25+5:302021-07-20T18:06:34+5:30
जवळपास दुकानदाराचे अडीच लाख रुपयांचे नुकसान; २० मिनिटात आग पूर्णपणे नियंत्रणात आली.

पुण्यातील कॅम्पमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग; एक कपड्याचे दुकान जळून खाक
लष्कर: एम जी रस्त्यावरील आंबा कॉम्प्लेक्स या व्यावसायिक इमारतीच्या तळमजल्यावरील कपड्याच्या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे दुपारी ३.१५ च्या दरम्यान आग लागून संपूर्ण दुकान भस्मसात झाले. यात जवळपास अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी तीनच्या सुमारास आम्हला आगीबद्दल कॉल आला होता. त्यानुसार पुढच्या ७ मिनिटांत फायर गाडी दुर्घटना स्थळी पोहोचली. आग तळमजल्यावर लागल्याने मोठ्या प्रमाणात वायरिंग जळल्याचा धूर आणि वास बाहेर येत होता.
त्यामुळे अग्निशमन कर्मचाऱ्यांनी बी ए एस सेट(ब्रिथिगं अप्यारटस सेट ) वापरात घटनास्थळी धाव घेतली. आणि आगीचे केंद्रस्थान शोधून काढले, त्यानंतर पुढच्या २० मिनिटात आग पूर्णपणे नियंत्रणात आली. दुकानचालक झहीद शेख यांनी ईद मुळे आठवड्यापूर्वी जवळपास अडीच लाख रुपयांचा माल भरला होता, आज तो संबंध जाळून खाक झाला आहे.