शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सिगारेटच्या थोटकामुळे आग? पुण्याच्या भूमी अभिलेख कार्यालय परिसरात ५० हून अधिक वाहने जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 10:44 IST

धक्कादायक बाब म्हणजे, इतकी मोठी हानी होऊनही अद्याप कोणत्याही खासगी कंपनीने किंवा व्यक्तीने या वाहनांवर मालकी हक्क सांगितलेला नाही.

लोहगाव: येरवड्यातील भूमी अभिलेख कार्यालयाच्या मोकळ्या आवारात सोमवारी दुपारी भीषण आग लागल्याची खळबळजनक घटना घडली. या आगीत पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या सुमारे १५ ते २० चारचाकी आणि ४० ते ५० दुचाकी अशी एकूण ५० हून अधिक वाहने जळून खाक झाली आहेत. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी १२:३०च्या सुमारास भूमी अभिलेख कार्यालयाच्या मैदानात अचानक आग लागली. येथील वाळलेले गवत आणि कचऱ्यामुळे आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. यावेळी मैदानात रांगेत उभी असलेली वाहने एकापाठोपाठ एक आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आगीमुळे परिसरात धुराचे मोठे लोट पसरले होते, ज्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या आगीत जळालेली ही सर्व वाहने नेमकी कोणाची आहेत, याबाबत अद्याप संभ्रम आहे. स्थानिक वाहतूक पोलिसांनी ही वाहने आमची नसल्याचे स्पष्ट केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, इतकी मोठी हानी होऊनही अद्याप कोणत्याही खासगी कंपनीने किंवा व्यक्तीने या वाहनांवर मालकी हक्क सांगितलेला नाही.

सिगारेटच्या थोटकामुळे आग?

आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, घटनास्थळी कचऱ्याचा ढीग आढळला असून, अज्ञाताने जळती सिगारेट फेकल्यामुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक संशय अग्निशमन दलाचे अधिकारी सोपान पवार यांनी व्यक्त केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Fire: Cigarette Butt Suspected Cause, Dozens of Vehicles Destroyed

Web Summary : A fire in Pune's Bhumi Abhilekh office premises destroyed over 50 vehicles. A discarded cigarette butt is suspected as the cause. No casualties were reported. The ownership of the burnt vehicles remains unclear.
टॅग्स :LohgaonलोहगावFire Brigadeअग्निशमन दलWaterपाणीSocialसामाजिकbikeबाईकcarकार