खराडीमधील भंगार गोदामाला लागली आग; एक लाख रुपयांचे सामान जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 18:03 IST2021-02-09T18:03:31+5:302021-02-09T18:03:43+5:30
गोडाउनमध्ये असणारे प्लॅस्टिक, पुठ्ठे असे जवळपास एक लाख रुपयांचे सामान जळून खाक झाले आहे.

खराडीमधील भंगार गोदामाला लागली आग; एक लाख रुपयांचे सामान जळून खाक
चंदननगर: खराडीमधील भंगार गोदामाला आग लागून आगीत भंगार दुकान खाक झाले. खराडी येथे भंनगाईवस्तीतील पाण्याच्या टाकी समोरील ईऑन आयटी पार्कच्या मागच्या रस्त्यावर असलेल्या गुड्डू खान (वय-40,रा.बनगाईवस्ती ) यांच्या भंगाराच्या दुकानाला आग लागल्याच्या घटना आज दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान घडली. ही आग कशी लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
गोडाउनमध्ये असणारे प्लॅस्टिक, पुठ्ठे असे जवळपास एक लाख रुपयांचे सामान जळून खाक झाले आहे. आगीची घटना कळल्यानंतर येरवडा केंद्रातील तीन बंब घटनास्थळी दाखल झाले .घटनास्थळी खराडी पोलिसांनी पाहणी केली.या आगीत कसलीही जीवीत हानी झाली नसल्याचे दुकानाचे मालक गुड्डू खान यांनी सांगितले.