शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

आळंदी म्हातोबा येथील डोंगराला लागली आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:12 IST

आळंदी म्हातोबा गावाच्या बाजूने असणारे डोंगर पावसाळ्यात हिरवळीने नेहमीच नटलेले असतात. शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी खाद्याची व्यवस्था या डोंगरामुळे पूर्ण होत ...

आळंदी म्हातोबा गावाच्या बाजूने असणारे डोंगर पावसाळ्यात हिरवळीने नेहमीच नटलेले असतात. शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी खाद्याची व्यवस्था या डोंगरामुळे पूर्ण होत असते. परंतु काल दुपारी अचानक अज्ञात इसमाकडून या ठिकाणी आग लावण्यात आली आणि पाहता पाहता संपूर्ण डोंगरावर आगीचे लोळ पाहायला मिळाले. डोंगरावर चरायला गेलेली जनावरे गावाच्या दिशेने पळू लागली. गावच्या सरपंच सोनाली जवळकर, उपसरपंच श्रीहरी काळभोर व इतर सदस्यांनी तरुणांच्या साहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु थोड्याच वेळात आगीने संपूर्ण डोंगर व्यापला होता. लोकवस्तीकडे सदरील आगीचा काही त्रास होऊ नये म्हणून सामाजिक कार्यकर्ते तुषार जवळकर यांनी वनविभाग व अग्निशामक दलाला याबाबत कल्पना देताच अग्निशामक दलाच्या गाड्या डोंगराच्या पायथ्याशी हजर झाल्या होत्या. वनविभागाच्या १४ जणांच्या तुकडीने गावातील तरुणांच्या साहाय्याने २२ किलो वजनाचे ब्लोअर किट (हवेच्या दाबाचे मशिन) खांद्यावर नेऊन आगीवर नियंत्रण आणण्यात आणले. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही. आगीची माहिती मिळताच महसूल विभागाच्या मंडळ अधिकारी गौरी तेलंग, गावकामगार तलाठी कणींचे व वनविभागाचे अधिकारी रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी उपस्थित होते.

चौकट

आज दुपारनंतर हवा वाढल्याने पुन्हा एकदा आगीने रौद्र रूप धारण करताच वनविभागाची तुकडी आळंदी म्हातोबा येथे हजर झाली. कालच्या प्रमाणेच ब्लोअर किटच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. परंतु वनविभागाच्या अखत्यारीत असणारा मोठा परिसर व त्याच्या तुलनेत कमी प्रमाणात असणारे मनुष्यबळ यामुळे तातडीची सेवा मिळण्यास नेहमीच दिरंगाई होत असते. सध्या असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत आहे. काही दिवसांपूर्वी अज्ञात शिकारी वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी काडतुसे पेरत असल्याचे निदर्शनात आले होते. गावातील स्थानिक मेंढपाळ रेखा खताळ या प्रकारामुळे जखमी झाल्या होत्या. मल्हारगडामुळे अनेक पर्यटक या ठिकाणी येत असतात. त्यामुळे वनखात्याने अशा प्रकारांवर आळा घालण्यासाठी या ठिकाणी गस्त घालावी.

कोट

गणेश म्हस्के

वनपाल

रात्री आम्हाला आगीची माहिती मिळताच आम्ही घटनास्थळावर दाखल झालो स्थानिक तरुणांच्या मदतीने व उपलब्ध साहित्याच्या आहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवले. आज दुपारीदेखील माझ्या टीमने उत्तम कार्यवाही करत आगीवर नियंत्रण मिळवले आहे.