Video: पुण्यातील हडपसरमध्ये ३ मजली जुन्या इमारतीला आग; अग्निशमन दलाकडून रहिवाशांची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 13:18 IST2024-11-15T13:15:36+5:302024-11-15T13:18:12+5:30
अग्निशमन दलाकडून रहिवाशांची सुटका करण्यात आली असून घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही

Video: पुण्यातील हडपसरमध्ये ३ मजली जुन्या इमारतीला आग; अग्निशमन दलाकडून रहिवाशांची सुटका
पुणे : पुण्यातील हडपसरमध्ये वैभव टॉकीज जवळ तीन मजली जुन्या इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. तसेच कोणीही जखमी नसल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हडपसरमध्ये एका जुन्या इमारतीला आग लागली होती. आग लागल्याची खबर मिळताच अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल झाले. दलाकडून अडकलेल्या रहिवाशांची सुटकाही करण्यात आली. त्यांनतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. सद्यस्थितीत आग पूर्णपणे आटोक्यात आली आहे. या घटनेत कोणीही जखमी नसून जीवितहानीही न झाल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे.
पुण्यातील हडपसरमध्ये ३ मजली जुन्या इमारतीला आग; अग्निशमन दलाकडून रहिवाशांची सुटका#pune#hadapsar#firepic.twitter.com/v88EocstDa
— Lokmat (@lokmat) November 15, 2024