पुण्यातील टिंबर मार्केट येथे गोडाऊनला भीषण आग; शेजारील घरांनाही आगीची झळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2023 10:50 IST2023-05-25T10:42:52+5:302023-05-25T10:50:32+5:30

अग्निशमन दलाची ३० अग्निशमन वाहने, खासगी वॉटर टँकर दाखल

Fire breaks out at Timber Market in Pune Neighboring houses also caught fire | पुण्यातील टिंबर मार्केट येथे गोडाऊनला भीषण आग; शेजारील घरांनाही आगीची झळ

पुण्यातील टिंबर मार्केट येथे गोडाऊनला भीषण आग; शेजारील घरांनाही आगीची झळ

पुणे : टिंबर मार्केट येथे लाकूड सामान असलेल्या गोडाऊनला सकाळी भीषण आग लागली होती. शेजारील चार घरांना ही आगीची झळ बसली आहे.  जवानांनी प्रथमत आग वस्तीमधे व शेजारील शाळेमध्ये पसरु न दिल्याने व सुमारे १० सिलेंडर बाहेर काढल्याने मोठा धोका टळला आहे.

अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु होते. या घटनेत जखमी वा जिवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांकडून नियंञणात आणण्यात आली. आता त्याठिकाणी कुलिंग ऑपरेशन सुरु आहे. मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्यासमवेत इतर २० अधिकारी व जवळपास १०० जवान आणि पुणे मनपा- पुणेकॅन्टोमेंट-पीएमआरडीए-पिंपरीचिंचवड अग्निशमन दल अशी एकुण जवळपास ३० अग्निशमन वाहने व खाजगी वॉटर टँकर दाखल झाले होते. 

Web Title: Fire breaks out at Timber Market in Pune Neighboring houses also caught fire