अजित पवार यांच्या मुळशीतील फार्म हाऊसला आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 21:58 IST2019-08-11T21:51:14+5:302019-08-11T21:58:40+5:30

मुळशी तालुक्यात असणाऱ्या अजित पवार यांच्या फार्म हाऊसला आग लागल्याची घटना आज संध्याकाळी सहाच्या सुमारास घडली.

Fire breaks out at Ajit Pawar's Mulshi farm house | अजित पवार यांच्या मुळशीतील फार्म हाऊसला आग

अजित पवार यांच्या मुळशीतील फार्म हाऊसला आग

पुणे : अजित पवार यांच्या मुळशी येथील फार्म हाऊसला भीषण आग लागली. आगीचे राैद्र रुप लांबूनच नजरेस पडत हाेते. संपूर्ण परिसरात धुराचे लाेट पसरले हाेते. रविवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास ही आग लागल्याचा अंदाज आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटाेक्यात आणली आहे. 

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे मुळशी तालुक्यातील घाेटावडे येथे असलेल्या फार्म हाऊसला आज (रविवार) संध्याकाळी भीषण आग लागली. आगीचे राैद्र रुप लांबूनच नजरेस पडत हाेते. आगीची माहिती मिळताच स्थानिकांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाचे दाेन बंब घटनास्थळी दाखल झाले. आगीच्या तीव्रतेमुळे बंगल्याची माेठी हानी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या फार्म हाऊसवरुन न्यायालयीन वाद सुरु असल्याने काही दिवसांपूर्वी हे फार्म हाऊस चर्चेत आले हाेते. सध्या आग नियंत्रणात आल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. दरम्यान आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. 

Web Title: Fire breaks out at Ajit Pawar's Mulshi farm house