Pune: किसान डेअरीमध्ये आग; गंभीर जखमी होऊन मालकाचा मृत्यू, सुखसागरनगर मधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 12:10 IST2024-10-18T12:10:38+5:302024-10-18T12:10:57+5:30
स्थानिकांनी कुलूप तोडून आग विझवली, त्यावेळी डेअरीचे मालक आतमध्ये आगीने गंभीररित्या भाजून जखमी झाले होते

Pune: किसान डेअरीमध्ये आग; गंभीर जखमी होऊन मालकाचा मृत्यू, सुखसागरनगर मधील घटना
पुणे : सुखसागर नगर येथे किसान डेअरीमध्ये काल रात्री १२ च्या सुमारास आग लागली होती. या घटनेत त्याठिकाणी झोपलेल्या डेअरी मालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रामदास साळुंके, वय अंदाजे ६५ (रा येरवडा) असे त्या मालकीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुखसागर नगर येथे किसान डेअरीमध्ये काल राञी बारा वाजता आतमध्ये आग लागल्याची घटना घडली होती. त्याठिकाणी डेअरीचे मालक रामदास साळुंके झोपले होते. आग लागल्याचे स्थानिकांना कळताच त्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून आग विझवली. डेअरीचे मालक आतमध्ये आगीने गंभीररित्या भाजून जखमी झाले होते. त्यांना स्थानिकांनीच बाहेर काढले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. मालक रोज राञी कुलूप लावून तिथेच आतमध्ये झोपत असल्याचे असे स्थानिकांनी यावेळी सांगितले.