शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

'' विना हेल्मेट'' पुणेकरांकडून चार महिन्यात ३८ कोटी १० लाखांचा दंड वसूल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 11:54 IST

शहर पोलीस दलाने दुचाकीस्वारांना हेल्मेटसक्ती करण्याचा निर्णय गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात घेतला होता़..

ठळक मुद्देसीसीटीव्ही मार्फत मंगळवारीही २ हजार ६६५ जणांवर कारवाईरस्त्यावरील या दहशतीमुळे हेल्मेट वापरण्याचे प्रमाण ४५ टक्क्यांपर्यंत वाढले चार महिन्यात गतवर्षीच्या तुलनेत ११ प्राणघातक अपघात कमी झाल्याचा दावा

पुणे : रस्त्यावरील अपघाताच्या संख्येत निम्म्याने घट करण्याचा प्रयत्नांचा भाग म्हणून शहर पोलीस दलाने दुचाकीस्वारांना हेल्मेटसक्ती करण्याचा निर्णय गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात घेतला होता़. त्यानंतर संपूर्ण शहरात रस्त्यावर तसेच सीसीटीव्ही मार्फत कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली़. डिसेंबर २०१८ मध्ये तब्बल ४० हजार ५४८ दुचाकी वाहनचालकांवर कारवाई करुन त्यांच्यावर २ कोटी २ लाख ७४ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली होती़. जानेवारी महिन्यांपासून सीसीटीव्ही व प्रत्यक्ष रस्त्यावर वाहनचालकांना थांबावून पोलिसांनी जोरदार कारवाईला सुरुवात केली होती़. त्यामुळे पहिल्या चार महिन्यात प्रत्यक्ष रस्त्यावर व सीसीटीव्ही मार्फत तब्बल ७ लाख ६२ हजार ६४ वाहनचालकांवर ३८ कोटी १० लाख ३२ हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात आली आहे़. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१८ मध्ये पुणे शहरात ७९ हजार ३५ दुचाकी वाहनचालकांवर विना हेल्मेटची कारवाई करण्यात येऊन त्यांच्यावर ३ कोटी ९५ लाख १७ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला होता़. वाहतूक पोलिसांच्या रस्त्यावरील या दहशतीमुळे हेल्मेट वापरण्याचे प्रमाण ४५ टक्क्यांपर्यंत वाढले होते़. त्याचवेळी सीसीटीव्ही मार्फत दिवसाला ५ हजार पर्यंत वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत होती़. या कारवाईमुळे शहरात हेल्मेटसक्तीविरोधात आंदोलनही करण्यात आले़. पोलीस आयुक्तालयातील ‘भरोसा सेल’च्या उदघाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्यात आले होते़. त्यावेळी त्यांना हेल्मेसक्ती विरोधी कृती समितीने भेट घेऊन ही कारवाई थांबविण्याची मागणी केली होती़. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना काही सूचना दिल्याचा दावा शहरातील आमदारांनी केला होता़. मात्र, त्यानंतरही पोलिसांची कारवाई कायम राहिली़. फक्त वाहतूक पोेलीस हेल्मेटची किती कारवाई केली, याची आकडेवारी देण्यास त्यांनी टाळाटाळ सुरु केली़. त्याबरोबर शहर पोलीस दलाकडून शहरात पहिल्या चार महिन्यात गतवर्षीच्या तुलनेत ११ प्राणघातक अपघात कमी झाल्याचा दावा करुन तो हेल्मेटसक्तीमुळे झाल्याचे सांगण्यात येत होते़. सीसीटीव्हीवरुन केलेल्या हेल्मेट कारवाईच्या दंड वसुलीसाठी शहरात पोलिसांनी चौकाचौकात वाहनचालकांना अडवून मोबाईलवर संबंधित वाहनचालकावर किती गुन्हे आहेत, याची तपासणी सुरु केली़.  त्या वाहनचालकांवर हेल्मेटसह झेब्रा कॉसिंग व इतर गुन्हे असेल तर त्याच्याकडून दंडवसुली सुुरु केली होती़.

हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांवर सीसीटीव्हीमार्फत कारवाई करण्यात येते़. पर्वती दर्शन येथील एका दुचाकीस्वार तब्बल ३७ वेळा सीसीटीव्हीमध्ये सापडला होता़. त्याच्याकडून १८ हजार ७०० रुपये दंड वसुल करण्यात आला होता़, अशाप्रकारे दोनपेक्षा अधिक वेळा दंड असणाऱ्या टॉप १०० दुचाकीस्वारांची वाहतूक शाखेने यादी केली होती़.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातtraffic policeवाहतूक पोलीसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliceपोलिसtwo wheelerटू व्हीलर