शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

हप्ता थकल्याने फायनान्स कंपनीच्या वसुली महिलांकडून अर्वाच्च शिवीगाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 15:37 IST

वाकडेवाडी येथील मुथुट फायनान्स कंपनीतून २ वर्षांपूर्वी फिर्यादीने १४ लाख रुपये कर्ज घेतले आहे़...

पुणे : गेली दोन वर्षांपासून नियमित कर्जफेड करत असताना केवळ एक हप्ता थकल्याने एका नागरिकाला मुथुट फायनान्स कंपनीतील वसुली महिलांकडून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करुन बघून घेण्याची धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे़. याप्रकरणी प्रभाकर कुतवळ यांनी मुथुट फायनान्स कंपनीच्या या महिलांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांकडे तक्रार दिली होती़. त्यांनी केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे़. याबाबत पोलीस आयुक्त डॉ़. के़ . व्यंकटेशम यांच्याकडे ही कैफियत मांडल्यानंतर त्यांनी योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे सांगितले़. प्रभाकर कुतवळ यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांनी वाकडेवाडी येथील मुथुट फायनान्स कंपनीतून २ वर्षांपूर्वी १४ लाख रुपये कर्ज घेतले आहे़. आतापर्यंत ते नियमितपणे कर्जाचे हप्ते वेळेवर भरत होते़. सप्टेंबर महिन्याचा त्यांचा हप्ता थकला होता़. त्यांना फायनान्स कंपनीतून फोन करुन तेथील महिलांनी वाईट  शिवीगाळ केली़ व तुझ्याकडे बघुनच घेतो, अशी धमकी त्यांना दिली़.त्यांना आलेल्या फोनवरुन झालेल्या संभाषणातून त्यांचा १० सप्टेंबरचा हप्ता थकल्याचे सांगण्यात येते़. त्यानंतर हप्ता का भरला नाही़ अशी विचारणा केल्यावर ते माझा चेक मिळाला नाही़, सोमवारपर्यंत चेक मिळाला की हप्ता भरतो़, त्यावर कंपनीतून बोलणारी महिला त्यांना अर्वाच्य भाषेत झापायला सुरुवात करते़, तुम्ही महिनाभर झोपले होते का? लायकी आहे का तुमची असे म्हटल्यावर कुतवळ हे नीट बोला असे म्हणतात़... त्यावर ही महिला तुम्ही कोण लागून गेले़ आम्ही जहागिरदार आहोत, म्हणूनच तुम्हाला लोन देतो़ लायकी नाही म्हणून भीक मागायला कशाला येतात़, खिशात पैसे नाही तर घर कशाला घेता़, आम्हाला पैसे कसे वसुल करायचे माहिती आहे़.. तुमच्या गॅरेंटरला पहा आता कसे करतो़, कंपनी लोन देते ना तसे वसुलही करते़. त्यानंतर तर त्या महिलेने कहरच केला़. तुझ्या बायकोला पाठव, असे म्हणून त्यांना मानहानीकारक धमकी दिली़.. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस