अखेर कात्रज ते वेल्हे कायमस्वरुपी बस सेवा सुरू; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांना यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 12:30 IST2025-03-07T12:29:31+5:302025-03-07T12:30:09+5:30

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी कायम स्वरुपी बस सेवा सुरू करण्यासाठी पत्राद्वारे मागणी करण्यात आली होती

Finally, permanent bus service from Katraj to Velhe started Muralidhar Mohol efforts were successful | अखेर कात्रज ते वेल्हे कायमस्वरुपी बस सेवा सुरू; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांना यश

अखेर कात्रज ते वेल्हे कायमस्वरुपी बस सेवा सुरू; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांना यश

वेल्हे: अखेर कात्रज ते वेल्हे कायम स्वरुपी बस सेवा सुरू झाली असून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

पीएमपीएल कडून सुरुवातीला विंझर बस सेवा सुरू करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवस वेल्हे पर्यंत सेवा सुरू झाली. पण एस टी कडून त्यास आक्षेप घेण्यात आला. त्यामुळे वेल्हेपर्यंतची सेवा बंद करण्यात आली. पीएमआरडीची हद्द पाबे गावापर्यंत बस सेवा सुरू होती. वेल्हे गावातील मेंगाई देवी यात्रा निमित्त प्रायोगिक तत्त्वावर पुन्हा आठ दिवस सुरू करण्यात आली. त्यानंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी कायम स्वरुपी बस सेवा सुरू करण्यासाठी पत्राद्वारे मागणी केली. या मागणीला प्रशासनाने हिरवा कंदील दाखविला.अखेर कात्रज ते वेल्हे कायम स्वरुपी बस सेवा सुरू झाली त्याबद्दल केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे ग्रामस्थ, पर्यटक, विद्यार्थी, कामगार, व महिला कडून आभार मानण्यात आले.

Web Title: Finally, permanent bus service from Katraj to Velhe started Muralidhar Mohol efforts were successful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.