शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर इंदापूर’साठी उजनीतून पाच टीएमसी पाणी उचलण्यास मान्यता; मुख्यमंत्र्यांनी दिली मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 15:35 IST

खडकवासला , निरा डावा कालव्याचा पाणी प्रश्न सुटणार: राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

कळस: इंदापूर तालुक्यातील खडकवासला कालव्यावरील शेती सिचंन व निरा डावा कालव्यावरील बावीस गावांतील शेतीसाठी उजनी जलाशयातुन पाच टीएमसी पाणी उचलण्यास  राज्य शासनाची  परवानगी मिळाली आहे.त्यामुळे आता तालुक्यासाठी हा ऐतिहासिक निर्णय असल्याने शेतीला अच्छे दिन येणार आहेत.

या प्रस्तावावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची स्वाक्षरी झाली आहे. जलसंपदा मंत्रालयाने याबाबत शासन निर्णय पारित केला आहे ,अशी  माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली .खडकवासला कालव्यावरील शेटफळगढे पासुन बेडशिंगे पर्यंत ३६ गावांना उन्हाळी आवर्तनात टंचाई निर्माण होत होती .तसेच निरा डावा कालव्यावरील  २२ गावांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी राज्यमंत्री भरणे प्रयत्नशील होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या नियोजनानाखाली गेल्या काही वर्षांपासून मंत्री भरणे यांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा केला. पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मंत्री भरणे यांच्या प्रयत्नान यश आले आहे. दि २२ एप्रिल रोजी या प्रस्तावावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची अंतिम स्वाक्षरी झाली आहे .या योजनेसाठी येथील जनतेची आग्रही मागणी होती. 

याबाबत माहिती देताना मंत्री भरणे म्हणाले, कुंभारगांव परिसरातील उजनी जलाशयातुन १० हजार एच.पी. क्षमतेच्या विद्युत पंपाद्वारे पाणी उचलले जाणार  आहे. ते पाणी सुमारे १० कि.मी. अंतरावरील शेटफळगढे परिसरातील खडकवासला कालव्यात टाकले जाणार आहे. तेथुन हे पाणी खडकवासला कालव्यातुन बेडसिंगे पर्यंतच्या शेती सिंचनासाठीही पाणी वापरले जाणार आहे. सणसर जोड कालवातुन नीरा डाव्या कालव्यावरील बावीस  गावातील शेती सिंचनासाठी वापरले जाणार आहे .दोन्ही कालव्यावरील सुमारे हजारो हेक्टर क्षेत्र ओलिता खाली येणार आहे. सदर योजनेसाठी सुमारे ६०० कोटी रुपयेचा निधी खर्च होणार आहे  या योजनेसाठी दोन वषार्चा कालावधी जाणार आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी याबाबत आनंद व्यक्त केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आभार मानले आहेत.—————————————...तालुक्यातील सिंचन प्रश्न सुटणार तालुक्यातील महत्वकांक्षी या प्रकल्पाला अंतिम मंजुरी मिळाली आहे. चार महिन्यात होणार योजनेचा सर्व्हे  तातडीने  पूर्ण केला जाणार आहे. लाकडी निंबोडी नंतर हा महत्वाचा प्रश्न मार्गी लागणार आहे .यामुळे तालुक्यातील सिंचन प्रश्न सुटणार आहे.दत्तात्रेय भरणे ,राज्यमंत्री

टॅग्स :IndapurइंदापूरPuneपुणेWaterपाणीUddhav Thackerayउद्धव ठाकरेAjit Pawarअजित पवारSupriya Suleसुप्रिया सुळेUjine Damउजनी धरण