शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

अंतिम फेरी दोन नाट्यगृहांत

By admin | Updated: February 21, 2017 03:07 IST

राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी पुण्यात रंगणार असली तरी ती होत आहे दोन वेगवेगळ्या नाट्यगृहांमध्ये. राज्य सांस्कृतिक

पुणे : राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी पुण्यात रंगणार असली तरी ती होत आहे दोन वेगवेगळ्या नाट्यगृहांमध्ये. राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाने स्पर्धेचा कालावधी कमी करण्यासाठी ही क्लृप्ती शोधून काढली आहे. त्यावर ज्येष्ठ नाट्य समीक्षक माधव वझे यांनी आक्षेप घेतला आहे. मात्र स्पर्धा अशा पद्धतीने घेण्यावर सांस्कृतिक संचालनालय ठाम आहे.स्पर्धकांना एकाच पातळीवर ठेवायचे असेल तर एकच नाट्यगृह मिळायला हवे आणि एकाच वेळी ते सादर करण्याची संधी दिली पाहिजे असे वझे यांचे म्हणणे आहे. मात्र, व्यावसायिक नाटकेदेखील दोन वेगवेगळ्या नाट्यगृहांत होतातच ना, मग स्पर्धा का घेतल्या जाऊ शकत नाही, अशा शब्दांत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संचालकांनी वझे यांचा आक्षेप झटकला आहे. स्पर्धेविषयीच्या या निर्णयाबद्दल कुणाचा विरोध असेल तर तो मला सांगावा, मी बघेन काय करायचे ते? असा एकाधिकारशाहीचा सूर संचालकांनी आळविला आहे.यासंदर्भात राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक संजय पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, ‘‘व्यावसायिक नाटके ही दोन वेगळ्या नाट्यगृहांत होतात. मग स्पर्धा का नाही? २० नाटकांना वीस दिवस लावण्यापेक्षा दोन वेगवेगळ्या नाट्यगृहांत त्या आयोजित केल्याने परीक्षकांचा वेळही वाचणार आहे. आत्तापर्यंत एकही स्पर्धक किंवा परीक्षकाने यावर आक्षेप नोंदविलेला नाही. कुणाला काही सांगायचे असेल तर त्यांनी मला थेट सांगावे.’’ (प्रतिनिधी)भरत नाट्य मंदिर व टिळक स्मारकात  अंतिम फेरीचे उद्यापासून आयोजन राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने यावर्षीच्या ५६व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. दि. २२ फेब्रुवारी ते ४ मार्च दरम्यान टिळक स्मारक मंदिर आणि भरत नाट्य मंदिरात ही स्पर्धा रंगणार आहे. पहिल्यांदाच होणाऱ्या या प्रयोगावर माधव वझे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.  दोन्ही नाट्यगृहांमध्ये मिळणाऱ्या सुविधा या वेगळ्या आहेत. भरत नाट्यमध्ये कलाकार व प्रेक्षक यांच्यात एक नाते तयार होत असल्यामुळे तिथे जेवढे नाटक रंगते तितकेच टिळक स्मारक काय कुठल्याच नाट्यगृहात रंगत नाही. टिळक स्मारकची पहिली रांग दूर असणे, रंगमंचाची खोली, प्रकाशव्यवस्था, पडदा पडण्याची प्रक्रिया अशा खूप गोष्टी आहेत ज्या स्पर्धकांवरअन्याय करणाऱ्या ठरू शकतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले.  व्यावसायिक नाटकांमधल्या कलाकारांना तडजोडी कराव्या लागतात, त्या करण्यात नवल नाही, पण स्पर्धा ही समान पातळीवर असायला हवी आणि नाटकांची बक्षिसे वाढविण्यापेक्षा परीक्षकांच्या मानधनात वाढ करण्याचा विचार व्हायला हवा, असे ते म्हणाले.