शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

मुंढवा जॅकवेलचा मार्ग मोकळा

By admin | Updated: July 14, 2015 03:12 IST

शहरात निर्माण होणारे शुद्ध केलेले सांडपाणी मुंढवा येथील बंधाऱ्यातून जिल्ह्यातील शेतीसाठी सोडण्यात येणार आहे. या प्रकल्पाची जलवाहिनी आपल्या शेतातून

पुणे : शहरात निर्माण होणारे शुद्ध केलेले सांडपाणी मुंढवा येथील बंधाऱ्यातून जिल्ह्यातील शेतीसाठी सोडण्यात येणार आहे. या प्रकल्पाची जलवाहिनी आपल्या शेतातून टाकू नये यासाठी सर्वोच्च न्यायालयात एका शेतकऱ्याने धाव घेतली होती. मात्र, या प्रकल्पाचे काम ९० टक्के पूर्ण झाले असून, हा जनहिताचा प्रकल्प असल्याचे सांगत सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या मार्गातील शेवटचा अडथळाही दूर झाला आहे. हडपसर येथील संदीप तुपे यांनी महापालिकेच्या विरोधात याचिका दाखल केली होती. खडकवासला प्रकल्पातून शहरासाठी जादा पाणी मिळावे म्हणून पालिकेकडून शुद्ध केलेले तब्बल साडेसहा टीएमसी सांडपाणी शेतीसाठी सोडण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. तब्बल १०० कोटी खर्चून उभारण्यात आलेला हा प्रकल्प मार्चअखेरीस पूर्ण होणार होता. महापालिकेकडून या प्रकल्पासाठी टाकलेल्या जलवाहिनीचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. मात्र, शेवटच्या टप्प्यात एका शेतकऱ्याच्या शेतीमधून २०० मीटरची जलवाहिनी टाकण्याचे काम बाकी आहे. त्यासाठी तुपे यांचा विरोध होता. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून तुपे यांची भेट घेऊन त्यांनी जागा देण्याबाबत विनंतीही केली होती. मात्र, त्यांचा जलवाहिनीच्या कामास विरोध असल्याने त्यांनी पालिकेविरोधात दावा दाखल केला होता. आधी सत्र न्यायालय, नंतर जिल्हा न्यायालय, नंतर उच्च न्यायालयात तुपे यांनी याचिका दाखल केली होती. मात्र, सर्व न्यायालयांनी महापालिकेच्या बाजूने निकाल दिला होता. त्यानंतर तुपे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सोमवारी पुन्हा महापालिकेच्या बाजूने निकाल लागल्याचे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी सांगितले. दरम्यान, उच्च न्यायालयातच महापालिकेच्या बाजूने निकाल लागल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात पालिकेने आधीच कॅव्हेट दाखल केलेले होते. (प्रतिनिधी)